सांस्कृतिक

श्री.संत बाळू मामा यांची पालखी किल्ले धारुर शहरात……..

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) आदमापूर जि.कोल्हापूर येथील श्री संत बाळू मामा (Shri Balu Mama) ची पालखी सध्या किल्ले धारुर (Dharur) शहरात मुक्कामी आहे. शहरातील कसबा विभागात सध्या सदरीलपालखी मुक्कामी असून यामुळे याभागातील वातावरण भक्तिमय झाले आहे.

महाराष्ट्रासह जवळच्या राज्यात मोठा भक्तगन असलेल्या श्री बाळू मामाची (Shri Balu Mama) पालखी सध्या किल्लेधारूर (Dharur) नगरीत आहे. पालखी मुक्काम स्थळी भक्तिमय वातावरणांध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती होते. त्यानंतर महाप्रसाद होतो. या ठिकाणी शहरातील लोकांनी अन्नदान करण्याचे ठरवले याला सर्व नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी प्रत्येक अन्नदात्याने एक दिवस जेवण बनवायचे आणि सर्व गाव आणि बाळू मामांची मानसे यांनी जेवण करायचे असे सुरु आहे. आजपर्यंत नियोजनामध्ये सर्व पंगती पार पडल्या सर्व गावाने एकजूट होऊन हा सोहळा आनंदाने पार पाडला. यातून लोक एकत्र जमतात आणि एकजुटीचे वातावरण तयार होते. यातून लोकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी आदर वाढतो. रोजच्या जीवनामध्ये वापल्याला एकमेकांशी भेटायला आणि बोलायला वेळ नसतो. यामुळे सर्व गाव एकत्र येते आणि एकमेकात भक्तिभाव सलोखा प्रेम निर्माण होते आणि गावात एकजूट होण्यास मदत होते. सध्या या पालखीमुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण असून भाविकांची गर्दी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!