पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडेनी केला की इतर कुणी… अजित पवारांची गुगली

मुंबई दि.10 मार्च – सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे चांगलेच गाजले. या आक्रमक पावित्र्यामुळे सत्ताधारी महविकास आघाडी सरकार अनेक मुद्द्यावर बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. मात्र आज अजित पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या साथीने अनेक मोठ्या घोषणा करताना भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला चिमटे काढले. यात प्रामुख्याने परळी मतदार संघातून आमचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विजयी झाले. तिथे त्यांचा (पंकजा मुंडे Pankaja Munde) पराभव झाला. त्यांचा पराभव धनंजय यांच्यामुळे झाला की दुसऱ्या कुणामुळे झाला हे काही माहिती नाही’ असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर निशाना साधला.

(Pankaja Munde was defeated by Dhananjay Munde or someone else … Ajit Pawar’s googly)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव न घेता टीका केली. तुम्ही फार डोळ्यावर यायला लागले की बाजूला केलं जातं. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे. खडसे यांच्यानंतर काहींना वाटलं आपण वाचलो.त्यापैकी काहींचा विधानसभेत पराभव झाला. तर काहींना तिकीटं मिळाली नाही’ असा टोलाही अजितदादांनी लगावला.

दरम्यान परळी मतदार संघातून आमचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विजयी झाले. तिथे त्यांचा (पंकजा मुंडे Pankaja Munde) पराभव झाला. त्यांचा पराभव धनंजय यांच्यामुळे झाला की दुसऱ्या कुणामुळे झाला हे काही माहिती नाही’ असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपवर निशाना साधला. त्यामुळे पंकजा यांचा पराभव कुणामुळं झाला या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

तत्पूर्वी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी देखील सुधीर मुनगंटीवार यांना टोले लगावले होते. तुम्ही तर सर्वात वरिष्ठ होते. मात्र तुम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी डावलण्यात आलं. तरी तुम्ही कायम चेहऱ्यावर हास्य ठेवत होते. दुख: लपविण्यासाठीच ते कायम हसत होते, असंही देशमुख यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!