पंकजाताई मुंडे आयसोलेट…. मतदान सुरु

बीड: दि.१(प्रतिनिधी) पदवीधर मतदारसंघांतील (Graduate constituency) मतदानाला सकाळी ८ वाजता शांततेत सुरुवात झाली आहे. या दरम्यान रात्री आडेअकराच्या सुमारास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी भाजप (BJP) व महायुतीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे (Graduate constituency) उमेदवार  शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांच्यासाठी त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आवाहन केलं. पंकजा यांना सर्दी, खोकला व ताप असून यामुळे आयसोलेट (Isolate) व्हावे लागल्याने त्यांनी हे ट्वीट केले.

पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटमधून त्यांची प्रकृती बिघडल्याचेही स्पष्ट झाले आहे. ‘मला सर्दी, खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट (Isolate) झाले आहे… अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे आणि शिरीष बोराळकरांच्या (Shirish Boralkar) पारड्यात पहिल्या पसंतीची मते टाकून त्यांना विजयी करावे’, असे पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये (twit) नमूद केले आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे समर्थक व भाजपाचे (BJP) बंडखोर रमेश पोकळे (Ramesh Pokale) या निवडणूकीत अपक्ष निवडणूक (Election) लढवत आहेत. यामुळे पंकजा यांनी केलेल्या या ट्वीटनंतर (twit) मराठवाडा मतदारसंघात नेमकं काय होणार, याची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. दरम्यान मराठवाड्यात शांततेत मतदान सुरु झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून  देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!