परळी – बीड- अहमदनगर रेल्वे धावली ; पहा कसा असेल रेल्वेचा प्रवास.

44 / 100

बीड दि.23 सप्टेंबर – परळी- बीड- अहमदनगर रेल्वे आज प्रत्यक्षात धावण्यास सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित परळी- बीड- अहमदनगर रेल्वे रुळावरील नवीन आष्टी ते अहमदनगर या 66 कि.मी. रुळावर रेल्वेची प्रवासी सेवा सुरु करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

आजच्या रेल्वेसेवा शुभारंभ कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), खा. प्रितम मुंडे, खा. सुजय विखे पाटील, आ. सुरेश धस व अन्य मान्यवरांच्या प्रत्यक्ष प्रमुख उपस्थितीत नवीन आष्टी – अहमदनगर नवीन लाईनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिवगंत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

नवीन आष्टी – अहमदनगर नवीन लाईनची पार्श्वभूमी आणि फायदे :
• 66 किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन 261 किमी अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 खर्चाचा वाटा आहे.
• डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.
• यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.

अशी धावणार रेल्वे…
• डेमू ट्रेन (DEMU train) अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी (New Ashti) येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर (Ahemadnagar) येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.
हे आहेत रेल्वेचे थांबे (Station)…
• कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!