धारुर तालुक्यातील विद्यार्थ्याचा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग; वर्ल्ड रिसर्च फोरम संस्थेची 49 वी परिषद.

किल्ले धारूर दि.29 मे – मलेशिया येथे होत असलेल्या दोन दिवसीय (2 व 3 जून) आंतरराष्ट्रीय परिषदेला धारुरच्या संदीप शेंडगे या विद्यार्थ्याचा प्रत्यक्षपणे सहभाग होणार आहे. यामुळे त्याच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, वर्ल्ड रिसर्च फोरम ( World Research Forum ) संस्थेच्या वतीने 2 व 3 जून रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मलेशिया येथे क्वालंमपूरमध्ये ( Kuala Lumpur, Malaysia ) आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात युक्रेन – रशिया युध्द ( Ukraine – Russia ) संकटात भारतीय वंशाच्या अल्पसंख्यांक रोमा समुदायाची दुर्दशा या विषयावर विचार मांडण्यासाठी संदिप शेंडगे याचा सहभाग असणार आहे.

संदिप शेंडगे हा धारुर तालुक्यातील आवरगाव येथील रहिवाशी आहे. शेंडगे सध्या गुजरात केंद्रीय विद्यापीठ गांधीनगर येथील पीएचडी संशोधक विद्यार्थी आहे. संदिप शेंडगे यापूर्वी इंग्लंडची राजधानी लंडन (London, the capital of England) येथे पीएचडी च्या अभ्यासक्रमासाठी जाऊन आला आहे.संदीप राम शेंडगे आज मलेशियाची राजधानी कोललंमपुरकडे रवाना होणार आहे.

49 व्या आंतरराष्ट्रीय परिषदे मध्ये युक्रेन रशिया युद्ध संकटात भारतीय वंशाच्या अल्पसंख्यांक रोमा समुदायाची दुर्दशा या विषयावर आपले विचार मांडणार असल्याने त्याचे कौतूक होत आहे. सामान्य कुटूंबात जन्मलेल्या संदीपचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धारुर तालुक्यात झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या संदिपचे भाजपाचे युवा नेते रमेशराव आडसकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसाट, प्रा. मांगीलाल राठोड, डॉ. वाघमारे, डॉ. संजय पुसदेकर, गटसमन्वयक शिवाजीराव अंडील, मोतीराम बडे, ॲड. सतीश शिंदे, नगरसेवक बालाजी चव्हाण, रमेश लोखंडे इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

( Participation of students in Dharur taluka in international conference; 49th Conference of the World Research Forum. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!