सांस्कृतिक

प्रार्थनास्थळे उघडणार पण हे असणार नियम; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय.

मुंबई दि.25 सप्टेंबर – उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारनं अखेर राज्यातली मंदिरं तसच इतर धार्मिक स्थळं खुली करण्याची घोषणा केली आहे. कोविडच्या (Covid) ह्या संपूर्ण काळात महाराष्ट्रातली सर्व धार्मिक स्थळं बंद आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

(Places of worship will be opened but this will be the rule; Big decision of Thackeray government.)

सरकारच्या घोषणेनंतर 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळे (Religious places) उघडली जातील. त्यामुळे भक्त मंडळी एकाच वेळेस ठिकठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहेत. पण कोविडचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे धार्मिक स्थळं, त्यांची ट्रस्ट मंडळी, आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्या मंडळींनी नेमके कोणते नियम पाळायचे याची नियमावलीच (guidelines) आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

अशी आहे नियमावली.
1. धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर (Sanitizer) तसच स्क्रिनिंगची व्यवस्था करणं अनिवार्य
2. ज्यांना कोरोनाची लक्षणं (Symptoms of corona) नाहीत, फक्त त्यांनाच धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रवेश
3.ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेलं आहे त्यांनाच प्रवेश मिळेल
4.कोविड रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणं अनिवार्य, तसच ऑडिओ व्हिडीओही धार्मिक स्थळांमध्ये टाईम टू टाईम लावले जावेत.

5. एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्टनं ठरवायचं आहे. व्हेंटिलेशन, उपलब्ध जागा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. अर्थातच त्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय ठेवावा.
6. प्रत्येकानं बुटं, चप्पला वाहनातच सोडाव्यात. कुटुंबियांनी आणि प्रत्येकानं ते स्वतंत्र ठेवावेत.

7. धार्मिक स्थळाच्या परिसरातली दुकानं, कॅफेटेरिया, स्टॉल्सनी सोशल डिस्टन्सिंग (social distance) पाळावं
8. येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रॉपर मार्किंग करावी.
9. धार्मिक स्थळांमध्ये आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत.
10. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना दोघात कमीत कमी 6 फुटाचं अंतर असावं. याची जबाबदारी धार्मिक स्थळांच्या मॅनेजमेंटची असेल.
11. लोकांनी प्रवेश करण्यापूर्वी साबनानं हात धुवावीत, सॅनिटायजर मारावा.

12. धार्मिक स्थळांमध्ये बसताना सोशल डिस्टन्सिंग पाळला जावं. परिसरात जास्तीत जास्त मोकळी हवा राहील याची काळजी घ्यावी. एअर कंडिशन 24 ते 30 अंश सेल्सि. एवढं ठेवावं.
13. मुर्ती, धार्मिक ग्रंथ, पुतळे यांना हात लावता येणार नाही.
14. धार्मिक स्थळांवर कुठलंही मोठं कार्य ज्यामुळे गर्दी होईल असं करता येणार नाही.
15. भजन, किर्तन किंवा इतर धार्मिक गायन पूर्णपणे बंद असेल. पण धार्मिक गीतं वाजवता येतील.
16. कॉमन प्रार्थना चटई टाळावी. भक्तांनी त्यांची स्वत:ची चटई किंवा तत्सम कापड सोबत घेऊन यावे.
17. धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटणे, तुषार शिंपडणे अशा गोष्टी पूर्णपणे बंद असतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!