क्रिकेट खेळताना खेळाडू उपसरपंचाचा मृत्यू…..

हृदयविकाराच्या धक्क्याने उपसरंपच पाटील यांचे क्रिकेटच्या मैदानात निधन.
सांगली: दि.१७- सांगली जिल्ह्यातील ढवळी या गावात क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली. क्रिकेट खेळताना उपसरपंच अतुल पाटील यांना मैदानात हृदयविकाराचा (Heart attack) झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली.
आटपाडी येथे क्रिकेट (Cricket) स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत दि.१६ शनिवार रोजी एक सामना सुरु होता. मैदानात क्रिकेट (Cricket) खेळत असताना ढवळी गावचे उपसरपंच अतुल विष्णू पाटील (३५) यांना तीव्र हृदयविकाराचा (Heart attack) झटका आल्याने त्यांचे निधन (Death) झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियातून समोर आला असून गावकऱ्यांकडून दु:ख व्यक्त केलं जातं आहे. पाटील हे शुक्रवारी झालेल्या निवडणूकीत ते उमेदवार होते. तासगाव तालुका संघाकडून ते विकेट किपर म्हणून खेळत होते. रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, सहा वर्षाची मुलगी, तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.