विषबाधेमुळे दोन बालिका दगावल्या, दोघांची प्रकृती चिंताजनक; अंबाजोगाईतील घटना.

अंबाजोगाई दि.26 फेब्रुवारी – अंबाजोगाई (Ambajogai) शहरानजीकच्या नागझरी परिसरात एका कुटूंबातील रात्रीच्या जेवणानंतर विषबाधा होवून दोन बालिकांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे उघडकीस आले आहे.

( Poisoning kills two girls, both in critical condition; Incidents in Ambajogai. )

मिळालेल्या माहितीनूसार अंबाजोगाई जवळील नागझरी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. काशिनाथ दत्तू धारासुरे यांच्या घरात सदरील विषबाधेची घटना घडली. या घटनेत विषबाधा झालेल्या साधना (वय 6) व श्रावणी (वय 4) या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

धारासुरे कुटूंबातील आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक (critical condition) आहे. यात भाग्यश्री (वय 28) व त्यांचे बाळ नारायण (वय 8 महिने) यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नागझरी परिसर व अंबाजोगाईत हळहळ व्यक्त होत आहे. विषाबाधेची ( Food Poisoning) बातमी कळताच शहरात एकच खळबळ उडाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!