सोशल मेडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याला बेड्या

किल्लेधारूर दि.१०(वार्ताहर) पोलिस ठाणे अंतर्गत उमराई येथील तरुणाने सोशल मेडियाचा वापर करुन दोन धर्मात तेढ निर्माण करुन एकोपा टिकण्यास बाधक असा व्हिडीओ तयार करुन टिकटॉकवर वायरल केल्यामुळे गुन्हा नोंदवून तरुणास अटक करण्यात आली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील तरुणाने टिकटॉकवर दोन धर्मात तेढ निर्माण करणारे आणि धार्मिक एकोप्याला बाधा पोहोचवणारे व्हिडीओ अपलोड केल्याची माहिती पोलिस अधिक्षक कार्यालयातील जिल्हा सोशल मेडिया सेलला गुप्त बातमी कळाली. पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मेडिया सेलने दि.९ रोजी ६.३० ला मिळालेल्या माहितीवरुन तात्काळ दखल घेतली. यावरुन धारुर पोलिस हद्दीतील उमराई येथे जावून स.पो.नि. सुरेखा धस यांनी शहानिशा केली. यात सदरील तरुणाने धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडीओ टिकटॉकवर वायरल केल्याचे आढळून आले. यामुळे धारुर पोलिसात श्रीनाथ बालासाहेब केंद्रे यास दि.१० रोजी बारा वाजता ताब्यात घेतले. पोलिस शिपाई परमेश्वर वखरे यांच्या फिर्यादी वरुन भादवि कलम १५३ अ, २९५ अ, ५०५(२), १८८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा पुढिल तपास पोलि. उपनिरिक्षक संतोष भालेराव करत आहेत. सोशल मेडियावर सध्या पोलिसांची करडीनजर असुन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!