वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीचे पोलिसांनी दिले संकेत….

पुणेः दि.१९- गेल्या दोन आठवड्यापासून चर्चेत असलेले पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan suicide case) आता निर्णायक वळणावर येत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांना पूजा चव्हाणच्या आत्महत्येचला जबाबदर धरत राजकीय विषय केला. यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तब्बल १२ दिवसानंतर मोठं विधान करत वन मंत्री संजय राठोड यांची आवश्यकता नुसार चौकशी करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यासमोरील अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा (Pooja Chavan suicide case) चौफेर तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष होत नसल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, आम्ही या प्रकरणाचा तपास सर्वच अँगलने करत आहोत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सदर प्रकरणाची पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून, आवश्यकता असल्यास पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांची देखील चौकशी करण्यात येईल असं स्पष्ट केल. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड याचे नाव आल्यानंतर संजय राठोड गायब झाले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर राठोड यांचा राजीनामा देखील मागितला होता. तरीही गेल्या १२ दिवसांपासून राठोड मीडियासमोर आलेले नाहीत, त्यांनी आपली बाजूही मांडलेली नाही. मात्र, आता पुणे पोलिसांनी त्यांच्या चौकशीचे सुतोवाच केल्याने राठोड सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. राठोड यांच्या चौकशी नंतर या प्रकरणाचा मोठा खुलासा होणार आहे. पुजा चव्हाण हिच्या कुटूंबियांनी कोणतीही तक्रार दिली नसल्याने सुरुवातीला तपासात पोलिसांना मर्यादा आल्या होत्या. प्रकरण चिघळत गेल्यानंतर राज्य सरकारकडून निष्पक्षपणे तपास करण्याची सुचना करण्यात आली होती.
अरुण राठोड (Arun Rathod) यास पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई नाही असा सुर येत होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ११ ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्या ऑडीओ क्लिपमधील आवाज अरुण राठोड या तरुणाचा असल्याचे बोलले जात होते. सदर प्रकरणानंतर अरुण राठोड (Arun Rathod) हा देखील गायब झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. दरम्यान, दुसरा आवाज हा मंत्री संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, १२ दिवस झाले तरी पोलिसांनी या प्रकरणी अद्याप राठोड यांची चौकशी किंवा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही.