पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ऑडिओ क्लिप बनावट- आ. मिटकरी…… काय आहेत क्लिपमधील संवाद पहा…

उदगीर: दि.१५- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.आमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणात जे लोक दोषी आहेत, त्यांना कडक शिक्षा होईल. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झालेली, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांची पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणी ऑडिओ क्लिप ही बनावट असू शकते,” असे मत व्यक्त केले. काल पूजाचे वडील लहू चव्हाण यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देत माझ्या मुलीची बदनामी थांबवावी. तिनं आर्थिक विवेंचनेतून आत्महत्या केली, सोशल मीडियामध्ये (Social media) व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजाचा नसल्याचे स्पष्ट केलं.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या (Pooja Chavan suicide case) ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. कथित मंत्री आणि अरुण राठोड Arun Rathod) या त्यांच्या कार्यकर्त्याच्या संभाषणाच्या या क्लिप्स असल्याचा दावा करण्यात आला होता.
क्लिप पहिली:
कथित मंत्री: कुठे आहेस तू? (अरुण राठोडला उद्देशून) नंतर मला मंत्रालयात मिटिंग आहे.
कथित मंत्र्याचा अरुण राठोड नावाच्या कार्यकर्त्याचा या क्लिपमध्ये संवाद सुरू आहे. ते अरुणला त्याची विचारपूस करतात. त्याला मंत्रालयात बोलावतात. दोघंही बंजारा भाषेतच बोलत आहेत. (५० सेकंद)
क्लिप दुसरी:
मंत्री: कुठे आहेस अरुण तू?
थोडावेळ काहीच संवाद होत नाही. नंतर दोघांमध्ये त्या मुलीला समजावण्याची चर्चा होत आहे. तू येणार आहेस का? असं मंत्री अरुणला विचारतात. पूजाला समजावून सांगायला सांगतात. (४२ सेकंद)
क्लिप तिसरी
मंत्री: अरुण कुठे आहेस तू?
अरुण: एक्सप्रेस हायवेला आहे. दोन तास लागेल यायला.
मंत्री: एवढा लेट का?
अरुण: वाहतूक कोंडी होती. गाडीवालाही लेट आला.
मंत्री: तीन तास म्हणजे खूपच उशीर आहे.
अरुण: संध्याकाळी भेटणं जमणार नाही का?
मंत्री: तू ये नंतर बघू. आल्यावर फोन कर
अरुण: हाव. ओके. (१ मिनिट १८ सेकंद)
क्लिप चौथी
अरुण: सुसाईडचं वेड तिच्या डोक्यातून काढा.
मंत्री: ठिक आहे. काय करावं आता.
अरुण: तेच तिच्या डोक्यातून काढा. सुसाईड हा पर्याय नाही. खूप आयुष्य आहे अजून.
मंत्री: तेच तर सांगत आहे तिला मी.
अरुण: ती कितीतरी मुलींची आयडल आहे. तिच्या सारखं बनायला बघतात पोरी. सुसाईड करतेय म्हटल्यावर अवघड आहे.
मंत्री: हम्म
अरुण: असं थोडीच असतं.
मंत्री: तू कुठे आहे? बाहेर आहे का? ये ना.
अरुण: तुम्ही बोला.
मंत्री: काय बोलू तिला. एवढं क्लिअर बोलूनही त्याच मुद्द्यावर असेल तर…
अरुण: त्या दिवशीपासून सांगतो ट्रिटमेंट करू. नाहीच म्हणत होती. आज म्हणाली, तू आणि ते सांगतात तर ट्रिटमेंट करते. पण नंतर इलाज केल्यावर सुसाईड करेल म्हणते. असं थोडीच असतं.
मंत्री: हम्म
नंतर बराच गॅप जातो. संभाषण थांबतं.
अरुण: असं थोडीच असतं. तुम्ही काढा तिच्या डोक्यातून.
मंत्री: हम्म. तुला काय म्हणत होीत ती. काही तरी म्हटली ना. काही तरी आणून दे म्हणून… कशाला सांगितलं तू?
अरुण: कशाला म्हणजे? गरजेचं आहे सांगणं. असं थोडीच असतं. सुसाईड म्हणजे काय…
मंत्री: ठिक आहे. तू इथेच आहे ना.
अरुण: डोक्यातून काढा तिच्या. सुसाईड हा ऑप्शन नाही ना. (२ मिनिट २४ सेकंद)
क्लिप पाचवी
ही क्लिप १ मिनिट ३१ सेकंदाची आहे. त्यात हा मंत्री मुलीला कन्व्हिन्स करण्यासाठी अरुणला सांगत आहे. त्यात एका मुलीचा आवाजही येतो. तीही या मंत्र्याशी बोलते. ही मुलगी मंत्र्याला जेवण झालं का विचारत आहे. तर मंत्री तिला ज्यूस किंवा मंच्युरिअन आणून खायला सांगत आहे. मुलगीही या मंत्र्याला पटकन यायला सांगत आहे. त्यानंतर मंत्रीही तिला होकार देतात.
क्लिप सहावी
या क्लिपमध्ये हा मंत्री अजितदादासोबत मिटिंग असल्याचं अरुणला सांगतो. रात्री या मुलीला समजावलं पण ती ऐकत नसल्याचंही ते सांगतात. त्यावर कार्यकर्ता म्हणतो, पण आत्महत्या करणं हा ऑप्शन नाही ना? असं सांगतो. त्यावर मग मी काय करू? असा हतबल सवाल मंत्री करतात. त्यावर कार्यकर्ता म्हणतो, तिला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. तिला तुम्ही भेटा आणि समजवा. त्यावर मंत्रीही तिच्याशी चर्चा करायला तयार होतात. एखादी गाडी कर. तिला मुंबईत घेऊन ये. चर्चा करू, असं मंत्री सांगतात. त्यावर मी उद्या सकाळी येऊ का? असं कार्यकर्ता विचारतो. त्यावर होय, असं उत्तर मंत्री देतात. ही क्लिप २ मिनिटं १३ सेकंदाची आहे.
क्लिप सातवी
ही १२ मिनिटाची क्लिप आहे. या क्लिपमध्ये मंत्री वैतागलेला दिसत आहे. टेन्शनमध्ये असल्याचं ते सांगत आहेत.
मंत्री: मला एक तर टेन्शन टेन्शन आलंय. आधीच मी परेशान आहे. घराचं टेन्शन आहे. समजव तिला. तूच तिला कन्व्हिन्स करू शकतो.
अरुण: काही तरी मार्ग काढावा लागेल.
मंत्री: कन्व्हिन्स कर तू.
अरुण: कन्व्हिनस करावं लागेल, अवघड विषय आहे,. मागे लागेल… मी जातो आणि व्यवस्थित बोलतो.
मंत्री: ठिक आहे. तू कर नंतर मी येतो.
त्यानंतर या दोघांमध्ये मुलीच्या ट्रिटमेंटबाबत चर्चा सुरू होते. त्यावर अरुण ही मुलगी सर्किट असल्याचं सांगतो. त्यावर मंत्री तिला गोडीत समजावण्याचं अरुणला सांगतात. त्यावर हा बदनामीचा धंदाच आहे, असं अरुण म्हणतो. त्यावर माझ्या घरी काय चालू आहे माझं मलाच माहीत. घर डिस्टर्ब झालंय माझं. मला माहीत मी किती परेशना आहे. तिला समजाव तू, असं हा मंत्री म्हणतो. त्यावर तुमचं रेप्युटेशन आहे. हे तिला कळलं पाहिजे, असं अरुण म्हणतो.
मंत्री: मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थीत आहे.
अरुण: तुम्ही काही करणार नाही. मी बघतो परिस्थिती हाताळतो.
मंत्री: तूच काही तरी कर, मी काही करत नाही.
अरुण: मी करतो कन्व्हिन्स
क्लिप आठवी
ही २ मिनिटे २२ सेकंदाची क्लिप अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात या पूजाचा मृत्यू झाल्याचं कळतं. पूजाने आत्महत्या केल्यानंतरचा हा संवाद आहे. त्यात मंत्री हे अरुणला पूजाचा मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. दरवाजा तोडून आत जा, विलाससोबत आत जा आणि मोबाईल ताब्यात घे. तू फक्त मोबाईल ताब्यात घे, असं ते सांगतात. त्यानंतर पाठिमागे कुणाचा तरी आवाज येतो. पोलिस बोलत असल्याचं जाणवतं. सीपीआर दे म्हणून सांगत आहेत. त्यानंतर पूजाचा मृत्यू झाल्याचं अरुण मंत्र्याला सांगतो. डोक्यावर पडून तिचा मृत्यू झाल्याचं तो सांगतो. तुम्ही येणार आहात का म्हणून हा कार्यकर्ता विचारतो. तुमचा फोन सुरूच राहू द्या असंही तो सांगतो.
क्लिप नववी:
या क्लिपमध्ये ८ मिनिटं ४७ सेंकदाचा संवाद आहे. अरुण रुग्णालयात असून तिथेच त्यांचं मंत्र्याशी फोनवरून संभाषण सुरू असल्याचं दिसतं.
मंत्री: तू आधी फोन घे
अरुण: हॉस्पिटलच्या बाहेर आहे. आत सोडत नाहीत.
मंत्री: नातेवाईक आहे म्हणून सांग. पटकन जा.
त्यानंतर फोनमध्ये कुणाचा तरी आवाज येतो. बहुतेक पोलीस अरुणची चौकशी करत आहेत. तिने उडी मारली का? मुलीचं नाव काय? तिचं वय काय? पत्ता काय? असं अरुणला विचारलं जातं. त्यावर मुलीचं नाव पूजा चव्हाण. वय २२ पत्ता परळी वैजनाथ. आता पुण्यात मोहम्मदवाडी, हेमंत पार्क लेन क्रमांक १० मध्ये राहत असल्याचं अरुण सांगतो. त्याचं नावही तो अरुण राठोड म्हणून सांगतो. त्याचं वय २४ असल्याचं आणि पुण्यात पूजासोबतच राहत असल्याचं तो सांगतो. तिचा चुलत भाऊ असल्याचं तो सांगतो. मुलगी कशी पडली? असं त्याला विचारलं जातं. तेव्हा तो ती पडली तेव्हा बघितल्याचं सांगतो. ती कशी पडली हे कळलं नसल्याचं तो सांगतो. त्यावर ती पडली की तिने उडी मारली? असा सवाल पोलीस करतात. त्यानंतरच संभाषण अर्धवट तुटतं. थेट मंत्र्यांशी संवाद सुरू होतो.
मंत्री: हां, अरुण
अरुण: जबानी नोंदवत होते. गॅलरीबाबत विचारत होते.
मंत्री: गॅलरीतून मोबाईल काढ.
पुन्हा पोलीस अरुणला काही विचारतात. संभाषण तुटतं. नंतर मंत्री आणि अरुणचं मुलीच्या उपचाराबाबत संभाषण सुरू होतं. डॉक्टरांनी तिचा श्वास पाहिला. नाडी चेक केली. तिला पंप दिला, असं तो सांगतो. ती डोक्यावर आपटली. सिमेंटच्या रोडवर तिचं डोकं आदळल्याचं तो सांगतो. त्यावर मंत्री त्याला पुन्हा मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. कुणाच्याच हाती मोबाईल लागू देऊ नका असंही सांगतात. त्यानंतर पुन्हा संपर्क तुटतो. आता अरुणचा पोलिसांशी संवाद सुरू होतो. मी तिचा सख्खा चुलत भाऊ. आम्ही तिघं एकाच रुममध्ये राहतो, असं तो पोलिसांना सांगतो. पुन्हा त्याचा मंत्र्याशी संवाद सुरू होतो. मंत्री हॅलो हॅलो करतात. पण प्रतिसाद येत नाही. विलास…. अरुण… अरुण… असा आवाज देतात पण आवाज येत नाही. काही वेळ असाच जातो.
त्यानंतर पुन्हा संवाद सुरू होतो. मंत्री अरुणला म्हणतात, तू कर पहिलं. काहीही चॅटमार. काहीही हालचाल कर. बाजूलाच राहा. फोन करत राहा. त्याचवेळी मंत्री त्याला फोन ताब्यात घ्यायला सांगतात. नातेवाईकांना गावावरूनही आणायला सांगतात.
क्लिप दहावी
मंत्री: तू काहीच करू नको बस. चिंता करू नको. मदत करू. मी सांभाळतो. माझ्यावर भरोसा ठेव. ठिक आहे?
अरुण: हो.
पूजाने आत्महत्या केल्यानंतर या दोघांमध्ये संवाद होतो. त्यात मंत्री आपण सर्व काही पाहून घेत असल्याचं सांगताना दिसत आहे. ही १ मिनिट २ सेकंदाची क्लिप आहे.
क्लिप अकरावी
शेवटची क्लिप ही २ मिनिटं २२ सेकंदाची आहे. रुग्णालयातील हा संवाद आहे. या ठिकाणी पूजाचं शवविच्छेदन सुरू आहे. या ठिकाणी तिचा भाऊही आहे.
अरुण: पोस्टमार्टेम सुरू आहे.
मंत्री: असं का…
मंत्री: दोरीने चढ आणि मोबाईल काढ. चऱ्हाटाने जा.
त्यानंतर मंत्री विलासशी संवाद साधतात.
विलास: सर काय करू? (विलासचा सूर रडवेला आहे. तो घाबरलेला आहे. हे त्याच्या बोलण्यातून जाणवतं)
मंत्री: काय करू शकतो विलास? ( मंत्र्याच्या या प्रश्नानंतर विलास रडायला लागतो)
मंत्री: तू हिंमतीने काम घे.
विलास: काय करू? डॉक्टर म्हणतात पीएम (शवविच्छेदन) करा.
मंत्री: दुसरी काय करू शकतो आपण.
त्यानंतर अरुण आणि मंत्र्याचा संवाद होतो. मंत्री त्याला घराचं बांधकाम तोडून आत जायला सांगतात. तसेच कुणी विचारलं तर आम्ही झोपलो होतो. ती चक्कर येऊन पडली, असं सांग असं मंत्री विलासला सांगतात. त्यावर माझी सांगायची हिंमत होत नसल्याचं विलास म्हणतो. पण तरीही मंत्री त्याला चक्कर येऊन पडल्याचं सांग म्हणून सांगतात. गॅलरीतून बॅलन्स गेला, चक्कर आली, असंही सांगतात. शेवटच्या क्लिपमध्येही मंत्री अरुणला मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. मोबाईल ताब्यात घे. दरवाजा तोड. आवाज आला तरी चालेल, असंही ते सांगतात.
अशा संवादाच्या अॉडिओ क्लिप सोशल मिडीयातून व्हायरल झाल्यामुळे पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलंच गाजलं. भाजपाकडून या प्रकरणाचा मोठा इशू करण्यात आला. भाजपकडून मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे थेट नाव घेतल्यामुळे ते अडचणीत सापडले. मात्र मागील दोन दिवसांत पुजा चव्हाण कुटूंबियांनी उघडपणे प्रतिक्रिया दिल्या, यासोबतच अरुण राठोडच्या (Arun Rathod) गावकऱ्यानी व बंजारा समाजाने बदनामी केली जात असून ते खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला. आज या प्रकरणात आ. आमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही या अॉडीओ क्लिप बनावट असू शकतात असा दावा केला.