पॉझिटीव्ह न्यूज… निर्बंध कमी होण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत.

जालना दि. 27 जुलै – गेल्या दिड वर्षांपासून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोनाची लाट ओसरल्यामुळे ठिकठिकाणी निर्बंध (restrictions) शिथिल करण्यात आले असले तरीही पूर्णपणे निर्बंध हटवण्यात आलेली नाहीत. निर्बंध हटवण्यात यावे अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. पण, याबद्दल टास्क फोर्स (Task Force) अभ्यास करत असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) याबद्दल निर्णय जाहीर करतील, असं सूचक विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं.

(Positive news … Health Minister’s signal to reduce restrictions.)

जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि निर्बंध कधी शिथिल केले जाणार याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट (Positivity Rate) कमी आहे. त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करत असून हा अहवाल दोन दिवसांनी आल्यानंतर निर्बंध कमी करायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील, असं टोपे यांनी सांगितलं.

निर्बंध कमी करण्यासंबंधीच्या मागण्या सर्वच स्तरातून होत आहे. विशेषतः दुपारी 4 नंतर दुकाने उघडण्याबाबत व्यापाऱ्यांकडून मागण्या होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधीत विभागाला आढावा घेण्याबाबत तसे आदेश दिले आहे. लोकांकडून निर्बंधांमध्ये बदल व्हावे, अशी मागणी होत आहे. पण, नेमके कसे निर्बंध कमी करावे, याबद्दल डॉक्टर व्यास अभ्यास करत आहे. त्यांच्या अहवालानंतर मुख्यमंत्री ठाकरे निर्णय जाहीर करतील, असंही टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, साथीचे आजार पसरु नये म्हणून पूरग्रस्त जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या टीम रवाना झाल्या आहे. पूरग्रस्त जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या टीम पाठवण्यात आल्या असून साथीचे आजार पसरवू नये म्हणून प्रतिबंधक उपाय करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्या त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर स्वच्छतेचं काम सुरू आहे. आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असून खाजगी हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांसाठी 50 टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!