पुजा चव्हाण आत्महत्या आणि राजकारण….

बीडः दि.१२ – मुळची बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असलेल्या पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या (BJP) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), पंकजा मुंडे (Pankaja Munde), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
चार दिवसांपुर्वी पुण्यात पुजा लहू चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने रात्री दिडच्या सुमारास राहत्या इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या (Suicide) केली होती. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पुजा चव्हाण (Pooja Chavan) हिच्या कुटूंबियांनी कसलीही तक्रार नसल्याचे सांगितले असताना सोशल मेडीयात (Social Media) आत्महत्येची चांगलीच चर्चा झाली. आत्महत्या झाल्याच्या नंतर पुजा आणि तिच्या मित्रांचे सध्याच्या राज्यातील मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमतील फोटो व्हायरल झाले अन सोशल मेडीयात (Social Media) एकच चर्चा रंगली. याप्रकरणी सर्वप्रथम भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना “राठोडगिरी” सहन करणार का असा प्रश्न उपस्थित केला. तर याप्रकरणी पुण्यात वानवडी पोलिस ठाण्यात भाजपाच्या (BJP) महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, सोशल माध्यमातून यात एका मंत्र्याचा समावेश असल्याच्या चर्चेला उधान येताच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलिसांनी सत्य समोर आणण्याची मागणी केली. यासोबतच माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी केली. दिवसेंदिवस प्रकरणाला राजकीय वळण मिळत असून अद्याप सत्ताधारी पक्षाकडून याप्रकरणी कसलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र पुजा चव्हाण हिच्या फेसबुक अकाऊंट पासून थेट कार्यक्रमाचे फोटो व अॉडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येने आता राजकीय वळण घेतले असून पुजाचे जसे सत्ताधारी सोबतचे फोटो व्हायरल होत आहेत तसे भाजपाच्या कार्यक्रमातील फोटोही व्हायरल होत आहेत. मात्र या आत्महत्या (Suicide) प्रकरणी एका मंत्र्याचे नाव जोडले गेल्याने पोलीसांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.