धारुरात होणार दंडात्मक कारवाई… अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा.

किल्लेधारूर दि.14 डिसेंबर – कोरोना विषाणूशी (Corona Virus) लढण्यासाठी सद्यःस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसच प्रभावी साधन आहे. आता त्यात ओमायक्रॉन (Omicron) हा नवा व्हेरीएंट आपल्या शेजारील लातूर (Latur) जिल्ह्यात आला आहे. संभाव्य तिसरी लाट व ओमायक्रॉनचा धोका पाहता लोकांनी लसीकरणाचा टक्का वाढवून मास्क वापरावा असे आवाहन करत उद्यापासून शहरात दंडात्मक कारवाई सुरु करत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी (Additional Collector) मनिषा मिसकर यांनी दिली.
(Punitive action will be taken in Dharur … Additional Collector took stock.)
लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि घसरलेला टक्का वाढविण्यासाठी अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा मिसकर यांनी लक्ष घातले आहे. दरम्यान आज मंगळवारी (दि.14) रोजी त्यांनी धारुर (Dharur) शहरात भेट दिली. यावेळी शहर व तालुक्यात राबविण्यात येत असलेली लसीकरण (vacccination) मोहीम, कोविड सेंटर व उपाययोजनांचा आढावा घेतला.
लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मंगळवारी (दि. 14) अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा मिसकर यांनी नगर परिषद कार्यालयात भेट बैठक घेतली. कोरोनाचा नवा व्हेरीयंट (New variant) ओमायक्रॉनचा जिल्ह्यात धोका अधिक वाढू शकतो. लसींची (vaccine) उपलब्धता मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यातील सर्व पात्र लोकसंख्येला लसीकरण होण्यासाठी वेगात प्रयत्न केले जावेत, मास्क न वापरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करा अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (Third wave) उपाय योजनांचाही त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस तहसीलदार वंदना शेडोळकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, सहाय्यक पोलिस निरिक्षक (Assistant Police Inspector) नितिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चेतन आदमाने, नायब तहसीलदार जे.बी. तापडीया, प्रकाश गोपड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.