वडवणीमध्ये भाजप राष्ट्रवादीत राडा; पोलिसांचा सौम्य लाठिमार.

बीड दि.21 डिसेंबर – बीड जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज सकाळ पासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रातच जिल्ह्यातील वडवणी येथे मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. दरम्यान पोलिसांनी (Police) तात्काळ सौम्य लाठिमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सकाळी 11.30 पर्यंत जिल्ह्यात 33 टक्के मतदान झाले आहे.
(Rada in BJP NCP in Wadwani; Mild police beatings.)
महाराष्ट्रातील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Nagar Panchayat Election) आज मतदान होत आहे. यात बीडच्या आष्टी, पाटोदा, शिरुर कासार, केज व वडवणी या 5 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान बीडमधील वडवणी येथे (Beed) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत राडा झाल्याची घटना समोर आली आहे.
एका मतदान केंद्रावर भाजप – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यानंतर मतदान केंद्राच्या गेटवरच दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. मतदान केंद्राच्या गेटवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.
बीड जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात बीड जिल्ह्यात आज 5 नगरपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे. या 5 नगरपंचायतमध्ये एकूण 85 उमेदवार आहेत. त्यापैकी 20 जागांवर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने, निवडणूक होणार नाही.
उर्वरित 65 जागांसाठी बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी तब्बल 216 उमेदवार आपलं भविष्य आजमावत असून निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर या मतदानाला सकाळी 7:30 पासून सुरुवात झाली असून सायंकाळी 5:30 पर्यंत चालणार आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळी 11.30 पर्यंत जिल्ह्यात 33 टक्के मतदान झाले आहे.