शेती विषयक

पुन्हा पाऊस !… मराठवाड्यातील या जिल्ह्यात येलो अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज.

मुंबई दि.3 नोव्हेंबर – भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई विभागानं पुढील चार पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जारी केला आहे. कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

(Rain again! … Yellow alert in this district of Marathwada; Weather account forecast.)

कमोरिन आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र आता लक्षद्वीप आणि अरबी समुद्राकडे (Arabian Sea) सरकलं आहे. येत्या तीन दिवसांमध्ये हवामान प्रणाली तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. दक्षिण कोकण (Southern Kokan), गोवा (Goa), दक्षिण महाराष्ट्रात (Southern Maharashtra) मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढचे 4-5 दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

यलो अलर्ट
रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर (Latur) जिल्ह्यांना 3 नोव्हेंबरला यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद (Osmanabad), लातूर, नांदेड (Nanded) जिल्ह्यांना 4 नोव्हेंबर यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आलाय. याशिवाय 7 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे (Pune), सांगली, सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!