धारुर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधि; आमदार प्रकाश सोळंके यांच्या प्रयत्नांना यश.

किल्ले धारूर दि.15 मार्च – सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. प्रकाशदादा सोळंके( Prakash Solanke) यांनी येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या निवासस्थानासाठी 1 कोटी 5 लाख 46 हजार रुपयांचा निधि मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) माधव निर्मळ यांनी दिली.
आमदार (MLA) प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रयत्नांमुळे धारुर (Dharur) शहरातील अनेक विकास कामांसाठी निधि मिळाला आहे. शहरात प्रलंबित रस्त्यांच्या कामासाठी रस्ते विकास योजनेतून दोन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. याशिवाय स्थानिक विकास निधितून शहरात सामाजिक सभागृह करण्यात येत आहेत.
येथील तहसील कार्यालयात दुय्यम निबंधक कार्यालयाच्या (Registrar’s Office) नवीन इमारतीसाठी 58 लक्ष रूपयांचा निधि आ. प्रकाशदादा सोळंके यांनी दिला असून सदर इमारत बांधकाम प्रगतीपथावर आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) आ. प्रकाशदादा सोळंके यांनी येथील येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या निवासस्थानासाठी 1 कोटी 5 लाख 46 हजार रुपयांचा निधि मंजूर करुन घेतला आहे.
लवकरच शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रलंबित विकासकामे नव्या जोमाने करण्यात येणार असून जिल्हा नियोजन व इतर योजनांतून कोट्यवधीचा निधि आ. सोळंके व जयसिंगभैय्या सोळंके यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माधव निर्मळ यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, शहराध्यक्ष नितिन शिनगारे, युवानेते सुधीर शिनगारे, नगरसेवक राजूसेठ कोमटवार उपस्थित होते.