परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला RDX ने उडवण्याची धमकी.

बीड दि. 28 नोव्हेंबर – दोन दिवसांपूर्वी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक परळी-वैद्यनाथ देवस्थानला धमकीचं पत्र मिळालं होतं. त्यापाठोपाठ आज अंबाजोगाईच्या (Ambajogai) योगेश्वरी (Yogeshwari temple) मंदिराला RDX ने उडवण्याची धमकीचं पत्र (Threaten letter) मिळालं आहे. यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

(RDX now threatens to blow up Yogeshwari temple in Ambajogai after Vaidyanath temple in Parli.)

बीड (Beed) जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने धमकीचे पत्र मिळालं आहे. परळीच्या (Parli) वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईच्या (Ambajogai) योगेश्वरी (Yogeshwari temple) मंदिराला RDX ने उडवण्याची धमकीचं पत्र (Threaten letter) मिळालं असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

एकापाठोपाठ एक दोन धार्मिक महत्व असलेल्या मोठ्या देवस्थानांना अशा स्वरुपाचे धमकीचे पत्र आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीड जिल्ह्यातील देवस्थानांना धमकीचे पत्र देणारा कोण त्याचा पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

काय आहे पत्रातील मजकूर
आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे.

हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवू. अशी धमकी असलेलं पत्र अंबाजोगाईच्या देवल कमेटीमध्ये शनिवारी रात्री पोहोचलं. अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला हे पत्र मिळताच देवल कमिटी चे सचिव अँड.शरद लोमटे यांनी अंबाजोगाई (Ambajogai) शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

देवल कमिटीच्या सचिवांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली. तसंच सुरक्षितता राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. परळीच्या वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरास ही असे धमकीचे पत्र प्राप्त झाल्यानं पोलिसांना आता या प्रकरणाचा कसून तपास करावा लागणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!