बीड जिल्ह्यात पुन्हा निर्बंध कडक; जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश.

बीड दि.4 मे – बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा (Corona Infection) वेग वाढत असून दररोज बाराशे पेक्षा जास्त नवीन कोरोना बाधित रुग्ण (Corona Positive) आढळून येत आहेत. यामुळे आता बीड जिल्हा प्रशासनाने नवीन आदेश काढत निर्बंध (Restrictions) अधिक कडक केली आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी (Collector) रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी सोमवारी रात्री उशिरा काढला आहे.
(Restrictions tightened again in Beed district; New orders of the Collector.)
कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) दुसऱ्या लाटेत बीड जिल्ह्यात प्रकोप वाढला आहे. यापुर्वी राज्य शासनाने कडक निर्बंध (Restrictions) जाहीर करुनही लोकांचा संचार कमी होत नाही. यामुळे कोरोना साखळी तोडण्यात अपयश येत आहे. शिथिल वेळेशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संसर्ग अधिक वाढत आहे. जिल्ह्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची ॲन्टीजन तपासणी (Antigen Test) करण्यात येत आहे.
या ॲन्टीजन तपासणी (Antigen Test) मोहिमेत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित (Corona Positive) आढळत आहेत. यामुळे आता पुन्हा नव्याने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या दि.5 मे पासुन पुन्हा बीड जिल्हावासियांना नवीन निर्बंधाचा सामना करावा लागणार आहे. नवीन आदेशानूसार दि.5 बुधवार पासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खालील बदल करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी (Collector) रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी दिले आहेत.
नवीन नियम…
1. बुधवार, गुरुवार, शुक्रवार (दि.5, 6 व 7 मे) या दिवशी केवळ औषधालय, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्माट्युकल्स, फार्माट्युकल कंपन्या, इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना व डिलर, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसीचे उत्पादन व वितरण, सॕनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल व सहाय्य सेवा, पेट्रोल पंप, टपाल सेवा हेच चालू राहणार.
2.दुधविक्री दररोज सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरु राहिल.
3. गॕस वितरण दिवसभर सुरु राहिल.
4. बँकेचे कामकाज दररोज सकाळी 10 ते 12 या वेळेत अंतर्गत कामकाजासाठी व व्यवहारासाठी सुरु राहिल.
5. शनिवार व रविवारी (दि.8 व 9 मे) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत (Essential services) मोडणाऱ्या आस्थापना ज्यात किराणा दुकान, भाजीपाला, मटन, चिकन विक्री दुकाने, बेकरी व कृषीशी निगडित अस्थापना सकाळी 7 ते 11 यावेळी सुरु राहतील.
6. शनिवार व रविवार केवळ हातगाड्यावर फळे विक्रीसाठी सांयकाळी 5 ते 7 यावेळेत करता येणार.