राज्यात पुढील पाच दिवसांत पावसाचे पुनर्आगमन ; हवामान खात्यानंतर पंजाबराव डख यांचाही अंदाज.

मुंबई दि.27 अॉगस्ट – राज्यात पुढील पाच दिवसांत पावसाचे पुनर्आगमन होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतर पंजाबराव डख यांनीही राज्यातील शेतकऱ्यांना पावसाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. अवघ्या काही दिवसांत गणपतीचे आगमन होणार असून नेमकं गणेशोत्सव काळात पाऊस पुनर्आगमन करणार आहे.
( Return of rain in next five days in the state; Forecast of Punjabrao Dakh after Meteorological Department. )
काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यात कुठेही फारसा पाऊस पडलेला नाही. आता गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला असताना राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्हानिहाय हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिला आहे. विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या (Maharashtra) घाटमाथ्यावर पाऊस होत आहे. या व्यतिरिक्त राज्यात अन्य ठिकाणी कुठेही पाऊस नाही. त्यानंतर आता विदर्भात पाऊस तर अन्य ठिकाणी हलका पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत हवामान खात्याकडून यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
पंजाबराव डख यांचा अंदाज
पंजाबराव डख यांच्या अंदाजानूसार सध्या राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप पाहायला मिळत मात्र 28 ऑगस्टला लातूर (Latur) आणि नांदेड (Nanded) तसेच विदर्भात (Vidarbha) पुन्हा हवामानात बदल होऊन मुसळधार पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव डख यांनी विदर्भात आणि मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांना शेतातील कामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इतर भागातील शेतकऱ्यांना शेती कामे करता येणार आहेत. राज्यात गणपतीच्या दिवसांत बऱ्याच भागात मुसळधार पाऊस (heavy rains) पडतो. पंजाबरावांनी या दिवसांमध्ये मौसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले आहे.
राज्यात येत्या 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार असल्याचे पंजाबरावांनी सांगितले आहे. काही दिवस पावसाची उघडीप असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची संपूर्ण कामे उरकून घ्यावीत. तसेच पिकांची देखील काळजी या दिवसांमध्ये घेण्याचे आव्हान पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी केले आहे. मान्सूनचा (Monsoon) पाऊस काही भागात बरसला नसल्यामुळे आता शेतकरी मौसमी पावसाची वाट पाहत आहेत. समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे बीड (Beed) जिल्ह्यासह अनेक भागात शेती कामे रखडली आहेत. यामुळे खरीप पिकांची पेरणी झालेली पिके पाऊस नसल्यामुळे सुकायला लागण्याची भिती व्यक्त होत आहे.