अपघातात मदत करणाऱ्यांना 5 हजारांचे बक्षीस; रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची नवीन योजना.

नवी दिल्ली दि.5 अॉक्टोंबर – दिवसेंदिवस वाढणारे अपघात (Accident) व अपघातग्रस्तांचे मदती अभावी होणारे नुकसान पाहता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची नवीन योजना (New scheme) हाती घेतली आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचविणाऱ्यांसाठी ही खास योजना सुरू करण्यात आली असून यात मदत करणाऱ्याला 5 हजारांचे तर राष्ट्रीय स्तरावर दहा जणांना 1 लाख रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

(Reward of Rs 5,000 to those who help in an accident; New scheme of Ministry of Road Transport and Highways.)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि परिवहन सचिवांना या योजने संदर्भात पत्र लिहिले आहे. सदरील योजना 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असणार आहे असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सोमवारी (दि.4) रोजी प्रामाणिकपणे मदत करणाऱ्यांना बक्षीस (Reward) देण्याच्या या योजनेसंदर्भात नियमावली जारी केली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा हेतू आहे.

राष्ट्रीय स्तरावर दहा जणांना एक लाख…
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या या योजनेंतर्गत, संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला रोख पुरस्कारासोबतच एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर या पुरस्काराशिवाय, राष्ट्रीय स्तरावर 10 सर्वात प्रामाणिकपणे सहकार्य करणाऱ्यांना एक-एक लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे. प्रतिवर्षी अपघातात मोठी वाढ होत असून अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे शासनाने अपघातानंतर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत होण्यासाठी प्रोत्साहनपर ही योजना सुरु केली असून यामुळे वेळीच मदत मिळून अपघातग्रस्ताचे प्राण वाचवण्यासाठी मोठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!