धारुर दुःखद वार्ता… सय्यद मदार यांचे निधन; दुपारी होणार अंत्यसंस्कार.

किल्लेधारूर दि.6 अॉगस्ट – धारुर (Dharur) शहरातील डोंगरवेस बाराकमान भागात राहणारे ज्ञानराज विद्यालय उंदरी येथील निवृत्त सेवक सय्यद मदार लाला (74) यांचे वृध्दापकाळाने निधन (Died of old age) झाले.
(Sad news … Syed Madar passes away; Funeral will be in the afternoon.)
तालुक्यातील अंजनडोह येथील विठ्ठल शिक्षण संस्थेच्या ज्ञानराज विद्यालयात 30 वर्ष सेवक म्हणून सय्यद मदार यांनी काम केले होते. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून अल्पशा आजारामुळे उपचार सुरु होते. आज पहाटे 2 च्या सुमारास अंबाजोगाई (Ambajogai) येथील स्वाराति रुग्णालयात (SRTR) उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन नातवंडे असा परिवार आहे. ते पुणे येथे एमआयटी (MIT Pune) महाविद्यालयात कार्यरत असलेले सय्यद जलील यांचे वडील होत. त्यांच्यावर आज दुपारी 2 वाजता अंजनडोह येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहेत.