बीडच्या संजय सानपला आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणी अटक; सायबर पोलिसांकडून मोठी कारवाई.

बीड दि.21 डिसेंबर – आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणी बीड जिल्ह्यात आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून भारतीय जनता युवा (BJP) मोर्चाचे माजी अध्यक्ष असलेल्या संजय सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. आज (दि.21) पहाटे जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नालॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विनीकुमार यालाही बेंगलूरु येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
(Sanjay Sanap of Beed arrested by health department in paper leak case; Major action by cyber police.)
आरोग्य पेपरफुटी प्रकरणात भूम, उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालय सहायक अधीक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप याला सायबर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने एजंट संजय सानप याला आरोग्य विभागाचे गट क व गट डचे पेपर पुरविल्याची कबुली दिली होती.
पोलिस निरीक्षक (Police Inspector) मीनल सुपे -पाटील व त्यांच्या सहकार्यांनी संजय सानप याला रविवारी अटक केली. त्याला सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. संजय सानपला 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात बीड (Beed) जिल्ह्यात यापुर्वीही कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी 6 जण ताब्यात घेण्यात आलेली आहेत. संजय सानप याचे मूळ गाव असलेल्या वडझरी परिसरातील अनेक मुलांना त्याने नोकरीला लावले असल्याचेही बोलले जात आहे.
आरोग्य विभाग (Health Department) पेपर फुटीनंतर म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणात इतर परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत आहेत. म्हाडा पेपरफुटीवरून हा तपास सुरू झाला, त्यातून इतर परीक्षांचे घोटाळे समोर आले त्यामुळे भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात आणि अटकही होऊ शकते. ही फक्त सुरुवात असल्याचे पुणे पोलीस आयुक्त (Commissioner of Police) अमिताभ गुप्ता यांनी म्हटले होते.
पुणे (Pune) सायबर पोलिस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे आरोग्य सेवा गट ड परिक्षा गैरव्यवहारात संजय सानप यांचा सहभाग आढळून आला. यामुळे सानप याला अटक करण्यात आलेली आहे. आरोग्य पेपर फुटी, महाडा पेपर फुटी (Paper Leak) आणि आता टीईटी परीक्षेत (TET Exam) झालेल्या गैरव्यवहाराचा तपास पुणे सायबर पोलीस (Cyber Police) करत आहेत. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, अशांनी पुढे येऊन पोलिसांना (Police) सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.