‘गाव तिथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस’ संकल्पनेला बीड जिल्ह्यात सुरूवात-प्रणव मंगरुळकर

बीड दि.13 मे – गाव पातळीवर संघटना मजबुतीसाठी प्रत्येक गावात आणि खेड्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (Nationalist Students Congress) पोहोचवण्या संदर्भात नुकतेच प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम व जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर यांनी बीड जिल्हा (Beed district) पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांना सुचना केल्या आहेत.

(Pranav Mangrulkar launches ‘Gaon Tithe NCP Vidyarthi Congress’ concept in Beed district)

ही मोहीम बीड जिल्ह्यात सुरू झाली असुन लवकरच प्रत्येक गावात व खेड्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसशी जोडली जाईल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी संघटना सहजरित्या उपलब्ध होऊ शकेल असे मत जिल्हा सरचिटणीस प्रणव मंगरुळकर यांनी दिली.

आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्याच्या कार्यकारिणीची जबाबदारी प्रणव मंगरुळकर यांच्याकडे सोपवली असुन येणाऱ्या महिन्याभरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची व्याप्ती तालुका पातळीपासून पुढे गाव, खेड्याच्या पातळीपर्यंत आणि प्रभाग पातळीपासून शाखा पातळीपर्यंत कश्याप्रकारे करता येईल याचे सर्व मार्गदर्शन वरिष्ठांकडून करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!