राज्यात शनिवारची कोरोना स्थिती; बरे होणाऱ्यांची दिलासादायक आकडेवारी.

मुंबई दि.25 एप्रिल – कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात त्सुनामीसारखा कहर केला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) याचा सर्वाधिक प्रभाव दिसत असताना आता एक दिलासादायक वृत्त आहे. मुंबईसारख्या सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या महानगरात मागच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत शनिवारी सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात तब्बल 63,818 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.

(Saturday’s corona status in the state; Comfortable statistics of healings.)

महाराष्ट्रात (Maharashtra) 24 तासांत 676 जणांचा मृत्यू तर राज्यात एकूण 67,160 रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर तब्बल 63,818 रुग्णांचा डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रुग्णांसह राज्यातील सध्याची सक्रिय रुग्णसंख्या 6,94,480 एवढी झाली आहे. तर आजच्या 676 मृत्यूंमुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा 63,928 वर गेला आहे. राज्यात आज 63,818 जण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील एकूण बरे झालेल्यांची संख्या 34,68,610 वर गेली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती (corona status)
सध्याची सक्रिय रुग्णसंख्या : 6,94,480
आतापर्यंतचे एकूण मृत्यू : 63928
आतापर्यंतचे एकूण कोरोना बाधित : 42,28,836
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 34,68,610

दरम्यान, मुंबईत (Mumbai) मागच्या 24 तासांत 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत काल 7221 रुग्ण आढळले होते, परंतु आज 5888 रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट मागच्या आठवड्यात 18 टक्के होता, तो आता घटून 15 टक्क्यांवर आला आहे. मुंबईत आज नव्याने आढळलेल्या 5888 रुग्णांच्या तुलनेत 8549 रुग्ण बरे झाले आहेत. मागच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत मुंबईत (Mumbai) आज सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!