कोरोंना विशेष

पंतप्रधान केअर फंडास नगराध्यक्ष डॉ. हजारीनी दिला एक लाख रुपये निधी

शहरात १५०० कुटूंबांना पौष्टिक किट वाटणार

किल्लेधारूर दि.२९ (वार्ताहर ) धारूर चे नगराध्यक्ष व भाजपा चे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी कोरोना या आपत्ती विरूध्द लढण्यासाठी पंतप्रधान केअर फंडास एक लाख रुपये निधी दिला आहे.

सध्या कोरोनाचे प्रादूर्भाव रोकण्यासाठी प्रत्येकजन आपआपल्या पध्दतीने मदत करत आहे. केंद्र व राज्य शासन नागरीका चे रक्षणासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहे. धारूर शहराचे नगराध्यक्ष व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी बालाघाट प्रतीष्ठानचे वतीने जिवनावश्यक वस्तू चे किट तयार केले आहेत.  कोरोना विरूध्द लढण्यासाठी पौष्टीक वस्तूंचा समावेश असणारे दिड हजार किट तयार करण्यात आले असून शहरातील गरजू 1500 कुंटूंबाना नियोजन बध्द पणे कार्यकर्त्या मार्फत घरपोच हे किट देण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. हे करत असताना शासनाला या कोरोना विरूध्द चे लढाईत मदत व्हावी म्हणून  डाॕ. हजारी यांनी पंतप्रधान सहायता निधी ला १००,००० /- ( एक लक्ष रुपये ) निधी दिला आहे. पंतप्रधान राहत फंड खात्या वर जमा करून या कार्यात सहभाग घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!