पहा कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा… कसा असेल जिल्ह्यातील अनलॉक; आपल्या प्रश्नांची उत्तरे.

मुंबई दि.5 जून – काल दि. 4 जून रोजी मध्यरात्री अनलॉक (unlock) बाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार लॉकडाऊनमधील (lockdown)   निर्बंधांबाबत (restrictions) पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत. यासोबतच इतर टप्प्यातील जिल्हे व निर्बंधाबाबत (restrictions) शिथिलता पुढील प्रमाणे असणार आहे. या आदेशात मात्र धार्मिकस्थळांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

(See which district at which stage … how the district will be unlocked; Answers to your questions.)

पहिल्या टप्प्यातील जिल्हे.
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ.
पहिला टप्प्यात सर्व सुरू असेल
रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, पहिल्या टप्प्यामध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे.
मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार
दुसऱ्या टप्प्यात काय सुरु?
50 टक्के हाॅटेल सुरू
-माॅल चित्रपटगृह – 50 टक्के
-लोकल- नाही
-सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाॅक सायकल सुरू
-शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली
-क्रीडा सायंकाळ सकाळी 5 ते 9
-संध्याकाळी 5 ते 9 सुरू – इनडोअर आणि आऊटडोर
-शुटिंग चित्रपट सुरू
-सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के खुले
-लग्न सोहळा मॅरेज हाॅल 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत
-अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल
-मिटींग आणि निवडणूक 50 टक्के उपस्थितीत
-बांधकाम, कृषी काम खुली
-इ काॅमर्स सुरू
-जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के सुरू
-शासकीय बस आसाम क्षमता 100 टक्के सुरू
-जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे
अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
तिसऱ्या टप्प्यात काय सुरु राहील?
-अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील
-माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील
-सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
-लोकल रेल्वे बंद राहतील
-मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा
-50 टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
-आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार ,
-स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल
-मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार
-लग्नसोहळा 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोक मुभा असतील
-बांधकाम दुपारी दोन पर्यंत मुभा
-कृषी सर्व कामे मुभा
-ई काॅम्रस दुपारी 2 पर्यंत
-जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

चौथा टप्प्यातील जिल्हे.
पुणे आणि रायगड
-अत्यावश्यक सेवा 2 वाजेपर्यंत सुरु
-सरकारी खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थिती राहणार
-क्रीडा 5 ते 9 आऊटडोअर सुरु राहणार
-सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही
-लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार
-अंतयात्रेला 20 लोक उपस्थित राहणार
-बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार
-शेतीची कामं 2 वाजेपर्यंत करता येणार
-ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध
-संचार बंदी लागू असणार
-सलून, जिम 50 टक्के क्षमता सुरु राहणार,
-बसेस 50 टक्के विना उभे राहणारे प्रवाशी

5 वा टप्पा, रेड झोनमध्ये
-पॉझिटीव्हिटी दर (positivity rate) 20 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये
-ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड 75 टक्के फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील
-5 वा टप्पा नेहमी रेड झोनमध्ये असेल

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!