धारुरमध्ये नकली नोटांचे रॕकेट; पोलीसांची कारवाई

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) शहरातील हनुमान चौकात एका बँक ग्राहक केंद्रावर आज सकाळी पोलिसांनी (Police) छापा टाकत नकली नोटांचे (Counterfeit notes) रॕकेट उघडकीस आणले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात नकली नोटा आढळून येत असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र अधिकृत तक्रार नसल्याने कुठलीही कारवाई होत नव्हती. आज मात्र बाहेरुन आलेल्या पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे हनुमान चौकात एका बँक ग्राहक केंद्र, झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला. यात २०० रु.च्या नकली नोटां (Counterfeit notes) आढळून आल्याची चर्चा असून पोलीसांनी संबधितासह साहित्य ताब्यात घेतले असून पोलीस (Police) तपास सुरु आहे.