बीड जिल्ह्यात व्यापाऱ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ; 16 सावकारांवर गुन्हा नोंद.

बीड दि.20 फेब्रुवारी – बीड ( Beed ) जिल्ह्यातील परळी ( Parali) शहरात अरुणोदय मार्केटमधील व्यापारी प्रवीण मालेवार यांनी स्वतःच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, दोन दिवसांपूर्वी 18 तारखेला उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. तर ही आत्महत्या ( Suicide ) सावकाराच्या जाचास कंटाळून केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी 16 सावकारांवर गुन्हा नोंद ( Crime record ) करण्यात आला आहे.

( Sensation due to trader’s suicide in Beed district; Crime record against 16 lenders. )

दि.18 शुक्रवारी मालेवार यांच्या आत्महत्येमुळे परळीत खळबळ उडाली होती. सदरील आत्महत्या सावकारी पाशाला कंटाळून झाल्याचे मयताने लिहिलेल्या पत्रानंतर उघडकीस आले. यानंतर सदरील आत्महत्या प्रकरणात मयत व्यापाऱ्याच्या पत्नीने परळी पोलिसात तक्रार ( complaint ) दिली.

मयत प्रवीण मालेवार यांच्या पत्नी मेघा मालेवार यांनी पोलिसात ( Police ) दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, 2013 साली प्रवीण यांनी 25 लाखांना घर खरेदी केले होते. यावेळी त्यांच्यावर खूप सारे कर्ज झाले होते. 2018 साली घर विकूनही पूर्ण कर्ज फिटले नाही. मुद्दल आणि व्याजासह पैसे देऊनही सावकारांनी अधिक रकमेसाठी त्यांच्याकडे तगादा लावल्याने ते तणावात होते.

गोपाळ मुंडे, सुभाष मुंडे, पारसेवार, मधुकर साखरे, विष्णु मुंडे, मयुर हरगावकर, शामराव कातकडे, प्रकाश चिद्रवार, संजय मुळे, अघाव मॅडम, अग्रवाल ग्लास, कृष्णा भांगे, बालाजी मुंडे, बाबर भाई, शिव ओपळे आणि बोकन सोनार यांचे कर्ज फेडूनही ते त्रास देत असल्याबद्दल प्रवीण यांनी हिशोबाची चिट्ठी लिहून गुरुवारी रात्री सांगितले होते.

मला खूप वैताग आला आहे, हे लोक मला सोडणार नाहीत, असेही प्रवीण म्हणाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडून प्रवीण यांनी दुकानात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. या दिलेल्या फिर्यादीवरून, परळी शहर ठाण्यात सर्व 16 सावकारांवर प्रवीण मालेवार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, सदर प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यामुळे सावकारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!