उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावल्याने खळबळ; धारुर तालुक्यातील प्रकार.

किल्लेधारूर दि.22 जून- धारुर (Dharur) तालुक्यातील रुईधारूर येथे समाजमंदिरा समोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्या महिले पैकी एका महिलेची प्रकृती अस्वस्थ असल्याने तिला उपचारासाठी अंबाजोगाई (Ambajogai) येथील (SRTR) रुग्नालयात हलवण्यात आले आहे. यामुळे खळबळ माजली असून अद्याप प्रशासनाकडून याची दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
(Sensation of deteriorating health of the fasting woman; Types in Dharur taluka.)
धारुर (Dharur) तालुक्यातील रूईधारूर येथे समाजमंदिरा समोरील अतिक्रमण काढण्याचे मागणी साठी दि.22 जून सोमवार रोजी सकाळी महिला आंदोलकांनी रुईधारुर गावात ग्रामपंचायत समोर तर पुरूष आंदोलकांनी पंचायत समिती समोर उपोषणास सुरुवात केली आहे. या मध्ये तीस ते पस्तीस महिला उपोषणास बसल्या आहे.
आज दि.22 मंगळवारी सांयकाळी महिला उपोषणकर्त्यापैकी (fasting woman) ललीता देविदास गायकवाड या वय 45 वर्षीय महिलेची प्रकृती अतीशय गंभीर झाली. यामुळे सदरील उपोषणकर्त्या महिलेस धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे तिस अंबाजोगाई (Ambajogai) येथे स्वामी रामानंद तिर्थ (SRTR) रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
सदरील प्रकरणात प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यानी उपोषणकर्त्याकडे पाठ फिरकल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत येथील पंचायत समितीतील एकाही अधिकाऱ्याचा संपर्क होवू शकला नाही.
दरम्यान, उपोषणास बसलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या जिवितास हानी झाल्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक हे जबाबदार राहतील. यासाठी वंचित विकास आघाडी या अंदोलनात उतरेल असा इशारा शहराध्यक्ष आकाश गायसमूद्रे यांनी दिला आहे.