खळबळजनक… 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले; पुन्हा अल्पवयीन मुलीची आत्महत्या.

वडवणी दि.16 नोव्हेंबर – वडवणी (Wadvani) तालुक्यातील उपळी येथील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी सायंकाळी शौचालयला जाते म्हणून घराबाहेर पडली असता एकाने साथीदाराच्या मदतीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. तर दुसऱ्या एका घटनेत उपळी येथे रागाच्या भरात घरातील आडुला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उपळी येथे घडली असून वडवणी पोलिसांत (Police) याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Sensational ... 17-year-old girl kidnapped; Again the suicide of a minor girl.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार (दि. 15 नोव्हेंबर) रोजी गावातीलच प्रदीप केशव पवार वय 24 वर्ष रा. उपळी ता.वडवणी जि. बीड (Beed) या तरुणाने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उपळी येथे घडली आहे. सदरील मुलीचे वडील कारखान्याला गेले असल्याचा फायदा या तरुणांनी घेतला आहे. सदरील या घटनेने गावांमध्ये खळबळ उडाली आहे.

सदरील मुलीला गाडीमध्ये बसवून पळवून नेत असताना मुलीच्या आत्याने स्वतः पाहिले असल्याने ही घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून (complaint) वडवणी पोलीस ठाण्यात गुरन.231/2021 कलम 363,34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) नितीन मिरकर यांनी दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) जयसिंग परदेशी करत आहे.

रागाच्या भरात मुलीची आत्महत्या
वडवणी तालुक्यातील उपळी येथील ज्योती अशोक इंगोले (वय 16 वर्ष) या अल्पवयीन मुलीने घरी कुणी नसल्याचा फायदा घेत रागाच्या भरात घरातील आडुला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत बीट अंमलदार ढाकणे यांनी घटनेची माहिती दिली. सदरील या घटनेने उपळी गावांमध्ये खळबळ उडाली आहे.

सदरील मुलीचे आई-वडील ऊसतोडणीसाठी परगावी गेले आहेत. मुलगी आजीकडे वास्तव्यास होती सदरील मुलीच्या आत्महत्येचे खरे कारण काय अद्यापही समजले नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी पंचनामा करत घटनेची नोंद केली असून लवकरच याचा शोध घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!