ड्रग्जप्रकरणी खळबळजनक दावा; शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी… पंचाकडून खुलासा.

मुंबई दि.24 अॉक्टोंबर – सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी (Drugs party) प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे (Shahrukh Khan) 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड (Bodyguard) आणि या प्रकरणात पंच असलेला प्रभाकर साईल यांनी केला आहे.

(Sensational claims in drug cases; Demand for Rs 25 crore from Shah Rukh Khan … Disclosure from Pancha.)

एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईल यांनी म्हटलंय. आपल्या जीवाला वानखेडे यांच्या कडून धोका असल्यानं एवढे दिवस गप्प होतो, असा दावा साईल यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांनीही व्हिडीओ शेअर करत ट्विट करत पंचाने केलेले आरोप गंभीर असल्याचे सांगितले  आहे.

काय म्हणाले प्रभाकर साईल…
केपी गोसावी यांने मला मुंबईला बोलावलं. त्याने सांगितलेल्या लोकेशनवर मी पोहोचलो असता ते एनसीबीचे कार्यालय निघाले. तिथे काही वेळाने केपी गोसावी आणि एक एनसीबी अधिकारी आले, त्यांच्यापाठोपाठ समीर वानखेडे आले. हे तिघेही दोन गाड्यांमध्ये निघून गेले. काही वेळाने ते परत आले, थोडं खाण्यापिण्याचं सामान घेतलं आणि क्रूझच्या गेटवर पोहोचलो, हे सर्व 2 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता घडलं.

दरम्यान, काही वेळाने गोसावी याने काही फोटो पाठवून त्या लोकांना मला ओळखण्यास सांगितलं. त्या 10-12 लोकांपैकी मी केवळ एका व्यक्तीला ओळखू शकलो. काही वेळाने त्या व्यक्तीला पकडल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्या व्यक्तीसह एकूण 13 जणांना पकडल्याचं केपी गोसावीने सांगितल्याचा दावा साईल यांनी केलाय. तसेच त्याने पाठवलेल्या फोटोंपैकी एक मुनमुन धमेचा होती, असं साईलने सांगितलं.

आर्यनला रात्री 12 वाजताच्या सुमारास एनसीबी कार्यालयात आणलं. त्यानंतर पंचाच्या सह्या करण्यासाठी गोसावीने आपल्याला एनसीबी कार्यालयात बोलावलं. वर गेल्यानंतर साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी मला कोऱ्या कागदावर सह्या करायला सांगितल्या. मी नकार दिला असता समीर वानखेडेंनी काहीच होणार नाही, तू सही कर असं म्हटलं. तेव्हा मी जवळपास 10 कोऱ्या कागदावर सह्या केल्या, असं साईल यांनी सांगितलं.

दरम्यान, कार्यालयात बसल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याचं फोनवरून कुणाशी तरी बोलण करून देत असल्याचं दिसतंय. काही वेळाने सॅम नावाचा व्यक्ती आला. त्यानंतर सॅम आणि गोसावी यांच्यामध्ये दोन मिटिंग झाल्या. त्यांनी सॅमला फोन करून 25 कोटींची डील करण्यास सांगितलं. माझ्या माहितीनुसार तो शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत बोलत होता. त्यानंतर एका ठिकाणी पूजा ददलानी, सॅम आणि किरण गोसावी यांची 15 मिनिटं भेट झाली, असं साईलने सांगितलं.

त्यानंतर किरणने मला 50 लाख रुपये आणायला जायला सांगितलं. इंडियाना हॉटेलजवळ (Indiana Hotel) गाडीतल्या दोघांनी पिशव्या दिल्या, त्यात पैसे होते. ते पैसे घेऊन मी सांगितल्याप्रमाणे वाशीला परत गेलो आणि पैसे गोसावीला दिले. मी पोहोचलो तेव्हा गोसावी कुठेतरी जायच्या तयारीत होता. दुसऱ्या दिवशी गोसावीने फोन करून बोलावलं आणि पैशाची पिशवी सॅमला दिली. दरम्यान, गोसावीने समीर वानखेडेंना पैशांच्या डीलसंदर्भात माहिती देण्यासाठी व्हॉट्सअप कॉल केल्याचा दावा साईल याने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!