शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; उद्या होणार दुसरी शस्त्रक्रिया.

मुंबई दि. 11 एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) पुन्हा एकदा दाखल करण्यात आले आहे. उद्या सोमवारी आणखी एक शस्त्रक्रिया पार पडणार आहे. याबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

(Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital; The second surgery will take place tomorrow.)

शरद पवार यांना पित्ताशयाचा (Gallstones) त्रास उद्भवला होता. 31 मार्चला करण्यात आलेल्या शस्त्रक्रिकेनंतर उद्या सोमवारी आणखी एका शस्त्रक्रियेसाठी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवारांसोबत त्यांची पत्नी, मुलगी खा.सुप्रिया सुळे आणि जावई रुग्णालयात दाखल झाले आहेत.

शरद पवार यांच्यावर 12 एप्रिल सोमवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना अचानक मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस पित्ताशयातील खडे (Gallstones) काढण्यात आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

शरद पवार त्यावेळेस चार ते पाच दिवस रुग्णालयात होते. आता मुंबईतील सिल्वर ओक या त्यांच्या खाजगी निवासस्थानी त्यांना आराम करण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. ज्यावेळेस शरद पवार (Sharad Pawar) यांना ॲडमिट करण्यात आले होते. त्याच वेळी त्यांच्यावर काही दिवसांच्या कालावधीनंतर न पित्ताशयाचे खडे काढण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे. त्यानुसार, शरद पवार हे रुग्णालयात दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांचे गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यासाठीच त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!