शरद पवारांनी घेतली उध्दव ठाकरे यांची भेट; पवार घेणार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक… राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता!

मुंबई दि. १५ मार्च – गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सचिन वाझे प्रकरण पुन्हा सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या अंगलट येण्याची शक्यता एनआयएच्या (NIA) तपासानंतर व्यक्त होत आहे. यात आज राज्याच्या राजकीय हालचाली वाढल्याच्या दिसुन आल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१५ मार्च) दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांची वर्षा निवास्थानावर भेट घेतली असून दुपारी चार वाजता राष्ट्रवादीच्या (NCP) प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
(Sharad Pawar meets Uddhav Thackeray; Pawar to hold meeting of NCP ministers … Possibility of political upheaval!)
पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मुंबई पोलीस (Police) अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेपर्यंत अशा कोणत्या ना कोणत्या विवादित मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे. सध्या सचिन वाझे प्रकरण ऐरणीवर आलेले असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आज (१५ मार्च) दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांची भेट घेतली. यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात तर्क वितर्काला वेग आला आहे. यातच दुपारी चार वाजता पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अधिवेशनानंतर ही पहिलीच बैठक असणार आहे. महाआघाडी सरकारमधील वादग्रस्त प्रकरणं आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे. माहितीनुसार दोन सत्रात ही बैठक पार पडणार आहे.
त्यामुळेच महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहेे. मागील तीन चार महिन्यात सचिन वझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार आजच्या बैठकीत घेणार आहेत. दुपारी चार वाजता दोन सत्रात ही बैठक होणार आहे.
दरम्यान, वादग्रस्त पोलीस (Police) अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयने (NIA) त्यांना मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील कारमधील स्फोटक प्रकरणात शनिवारी रात्री उशिरा अटक केली होती. या कारवाईनंतरच सचिन वाझेंचे पोलीस दलातून निलंबन होणार असे बोलले जात होते. अखेर आज सोमवारी सचिन वाझेंचे निलंबन करण्यात आले आहे. सचिन वाझेंचे (Sachin Vaze) दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. यापूर्वी २००३ मध्य ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझेंचे निलंबन झाले होते.