Sharad Pawar शरद पवारांचा कार्यकर्त्यांना निरोप ; राज्याच्या राजकारणात खळबळ.

मुंबई दि.2 मे – शरद पवारांचा कार्यकर्त्यांना निरोप घेवून अजित पवार, छगन भुजबळ, रोहित पवार व सुप्रिया सुळे दाखल झाले असून यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्ते व मेडीयाशी बोलताना निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन दिवस वेळ पवार साहेबांनी मागितल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले.
( Sharad Pawar .. Sharad Pawar’s message to workers; Excitement in state politics. )
आज लोक माझे सांगातीच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळ्यानंतर शरद पवार Sharad Pawar यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व निवडणूक लढवण्याच्या बाबतीत निवृत्तीचा निर्णय जाहिर केला. यानंतर राज्यातील राजकीय वातावण ढवळून निघाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे NCP राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्या अध्यक्ष पदाच्या व निवडणूक लढण्याच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करुन वाय. बी. चव्हाण सेंटर समोर आंदोलन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आ. धनंजय मुंडे यांनाही आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
कार्यकर्त्यांनी वाय. बी. सेंटरवर सुरु केलेल्या आंदोलनानंतर काही ठिकाणी राजीनामा सत्र सुरु झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जावून कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या. यावेळी शरद पवार यांनी निर्णयावर विचार करण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतील असा निरोप दिला. हा निरोप घेवून अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार व छगन भुजबळ वाय बी सेंटरवर दाखल झाले. यावेळी जयंत पाटील उपस्थित होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही असा कोणता प्रयत्न करु नये व आपापल्या घरी परतण्याची सुचना केली.