कोरोंना विशेष

पुनर्वसित गावा मधील १२ हजार लोकांची फिवर स्क्रीनिंग तपासणी

आ.प्रकाशदादा सोळंके यांचा उपक्रम

माजलगाव दि.३०(प्रतिनिधी)
माजलगांव मतदार संघाचे आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या आदेशाने शहरानंतर पुनर्वसित गावा मधील १२ हजार लोकांची फिवर स्क्रीनिंग करण्यात येत असून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.प्रकाशदादा सोळंके यांनी जनतेच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

आज खानापूर, रेणापुरी, शेलापुरी, ब्रम्हगांव, चिचंगव्हाण, पुनंदगाव, नागझरी, देवखेडा, नांदुर येथील घरोघरी जाऊन तपासणी केली. सकाळी ७ वाजल्यापासून आरोग्य विभागाची टिम तपासणी करत आहे. आज जवळपास ७०% तपासणी झाली असून उद्या सकाळ पासून पुन्हा या तपासणीला सुरवात होणार आहे. आ.प्रकाशदादा सोळंके यांनी प्रत्येक गावात जाऊन तपासणी पथकाला भेटी दिल्या व कोणताही नागरिक तपासणी पासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, जि.प. चे समाज कल्याण सभापती कल्याण आबूज, लोकनेते सुंदरराव सोळंके सह. साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन घाटूळ नाना, तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, डॉ.उध्दव नाईकनवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ .अनिल परदेशी, गटविकास अधिकारी चव्हाण, डॉ. पारगांवकर, कॉंग्रेस कमिटीचे दत्ता कांबळे, भगवानराव कदम , बाळासाहेब जोगडे, अर्जुन नाईकनवरे, शशिकांत मस्के, सरपंच प्रकाश शिंदे, माऊली शेडंगे , सह आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्थानिक आशा स्वयंसेवक, अंगणवाडी कार्यकर्ता ग्रामसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!