डिप्रेशनमुळे तिने संपविली जीवन यात्रा…. जिल्ह्यात दोघांची आत्महत्या
केज तालुक्यातही तरुणाची आत्महत्या

गेवराई दि.१८ – गेवराई शहरातील गणेश नगर भागत वास्तव्यास असणाऱ्या कल्याण पारेकर यांच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली असून नेमकी घटना काय आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
शहरातील गणेश नगर भागात कल्याण पारेकर यांचे वास्तव्य आहे. त्यांची १६ वर्षीय सायली नामक मुलगी या वर्षी ९८.२०% गुण घेऊन दहावी उत्तीर्ण झाल्याने तिला औरंगाबाद येथे क्लासेस ला ठेवले होते. दरम्यान सोमवारी रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर मंगळवारी पहाटे दिसून येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा शोध न लागल्याने कुटुंबीयांनी मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची पोलीसात तक्रार दिली.
दरम्यान बुधवारी दहा वाजता जवळच असणाऱ्या गोविंदवाडी शिवारातील एका विहिरीत सायली चा मृतदेह तरंगताना कांही लोकांना दिसून आल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे व उपनिरीक्षक श्री.टाकसाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली.
सुसाईड Suicide नोट आढळली……!
दरम्यान मी डिप्रेशन मुळे मरतेय माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये अशी सुसाईड Suicide नोट आढळून आल्याने या घटनेमागे नेमके काय कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
केज तालुक्यातही तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
केज तालुक्यातील धर्माळा येथील महेश सुरेश कदम (२०) या युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेवून आत्महत्या Suicide केल्याची घटना मंगळवारी घडली. सदरील युवकाने आयटीआयचे शिक्षण घेतले असुन त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. आज बुधवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस करत आहेत.