बीड जिल्ह्यात सध्या ‘शेठ’च्या वाढदिवसाचीच चर्चा; धारुरमधील आठवणीला उजाळा.

माजलगाव दि.3 जानेवारी – बीड (Beed) जिल्ह्यात सध्या माजलगाव शहरात भीक मागणाऱ्या व्यक्तीचा फोटो लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले असून या बॅनरमुळे चर्चेला उधान आले आहे. असाच प्रकार काही वर्षांपूर्वी धारुर शहरात घडला होता याची आठवण होत आहे.

(Sheth’s birthday is currently being discussed in Beed district; Brighten the memory in Dharur.)

वाढदिवस म्हणलं की नाना तऱ्हा आल्या, त्यातच आता युवा नेतृत्व, भावी हे भावी ते असे मथळे देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे फॅड सध्या गावागावांत विविध बॅनर कडे बघून दिसून येत आहे. असेच एक बॅनर माजलगाव (Majalgoan) शहरात लागले असून त्यावर भीक मागणाऱ्या व्यक्तीचा फोटो लावून त्यावर फुलांची उधळण करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. गेली तीन दिवस या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली असून माध्यमांसह वृत्तपत्रांनी याची दखल घेतली आहे.

वाढदिवस म्हणलं की, संबंधितांस निराळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो त्यातच सध्या वाढदिवस हे भावी नेता होण्यासाठी चांगलेच साधन झाले आहे. तरुण पिढी तर निराळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी नाना स्वरूपाच्या उपाध्या देऊन प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहेत. असेच एक बॅनर आज चर्चेचा विषय ठरले आहे.

माजलगाव शहरात एक भीक मागणाऱ्या व्यक्तीचा डिजिटल शहरातील चौकात लावल्याने खमंग चर्चा रंगली. त्याचा वाढदिवस (Birthday) देखील तितक्याच दणक्यात साजरा देखील केला. बॅनर वर फुलांची उधळण करून हा वाढदिवस काही तरुणांनी साजरा केला. या वाढदिवसाने दिवसभर शहरातील लागलेल्या इतर बॅनर ची चर्चा देखील चर्चिली जाऊ लागली. सध्या विविध शहरात अनोख्या पद्धतीने हे डिजिटल लागल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असते. त्याचाच निषेध म्हणून हे डिजिटल शहरात लागले असल्याची चर्चा सुरू आहे.

बॅनर ची संख्या वाढली
गेल्या काही दिवसात शहरात विविध स्वरूपाच्या बॅनर ने अतिक्रमण केले असून त्यातून शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. ठिकठिकाणी विविध आशयाचे बॅनर लागले असून त्यावर चाप बसावा म्हणून काही अज्ञात तरुणांनी हे डिजिटल लावले असल्याची चर्चा सुरू आहे.

ना नियम ना परवानगी
शहरात विविध प्रकारचे बॅनर गेल्या काही दिवसात लावण्याचे प्रमाण वाढते आहे. मुख्य रस्त्यावर दुतर्फा बाजूने विविध डिजिटल बॅनर लावल्याचे दिसून येत आहेत. त्याच बरोबर प्रत्येक चौकात देखील असे विविध आशयाचे बॅनर (Banner) लावल्या जात आहेत. डिजिटल साठी ना कोणता नियम लागू आहे का नाही असेच चित्र माजलगाव शहरात आहे.

धारुरची आठवण
काही वर्षांपूर्वी धारुर (Dharur) शहरातही अशा स्वरुपाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा (Birthday celebration) करण्यात आला होता. शहरात भीक मागुन पोट भरणाऱ्या विविध भिकाऱ्यांचे फोटो बॅनरवर झळकले होते. एवढंच नाही तर त्या सर्वांना आंघोळ घालून नवीन कपड्यासह थाटामाटात वाढदिवस तरुणाईकडून साजरा करण्यात आला होता. त्या वाढदिवसाची आठवण माजलगावच्या ‘शेठ’च्या वाढदिवसामुळे केली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!