धक्कादायक … अॉक्सिजनच्या अभावामुळे नालासोऱ्यात 12, नागपूरमध्ये 3 तर अहमदनगरमध्ये एकाचा मृत्यू ….

मुंबई दि.13 एप्रिल – नालासोऱ्यात धक्कादायक घटना समोर आली असून येथील कोविड सेंटर असलेल्या खाजगी रुग्णालयात अॉक्सिजनच्या अभावामुळे तब्बल 12 कोरोना बाधितांचा (Corona Positive) मृत्यू झाला आहे. यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात राडा करत तोडफोड केल्याची घटना घडली. तीन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर येथे तिघांचा तर अहमदनगर येथे एकाचा अॉक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
(Shocking … 12 died in Nalasoria, 3 in Nagpur and one in Ahmednagar due to lack of oxygen ….)
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अॉक्सिजन संपल्यामुळे (Lack of oxygen) नालासोऱ्यात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा येथील विनायक रुग्णालयात 7, सिध्दीविनायक रुग्णालयात 3 तर वसई ग्रामीणमधील 2 रुग्णांचा या मृत्यूत समावेश आहे. विनायक रुग्णालयात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात राडा करत रुग्णालयाची तोडफोड केली. याप्रकरणी रुग्णालयाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून आज या रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त आहे.
विनायक रुग्णालयाचे एमडी डॉ. रणजीत उपाध्याय यांनी नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावले असून सदरील रुग्णांची अवस्था अत्यंत अत्यवस्थ होती. या रुग्णांची फुप्फुसं 80 ते 90 टक्के खराब झालेली होती. याची कल्पना नातेवाईकांनाही देण्यात आलेली होती. मात्र मृत्यू नंतर नातेवाईकांनी बिलाच्या कारणावरुन आरडाओरड करत असा आरोप केल्याचे माध्यमाला सांगितले.
मात्र कोरोना विषाणू संसर्ग आता वेगवेगळी रुपं दाखवतं असून नवा स्ट्रेन थेट फुप्फुसावर परिणाम करत असल्याचे उघड होत आहे. महाराष्ट्रात सध्या अॉक्सिजनची समस्या उद्भवत असल्याचे दिसुन येत आहे. अनेक रुग्णालयात अॉक्सिजनची कमतरता (Lack of oxygen) असल्याचे समोर येत आहे. वसई विरार येथील गोल्डन पार्क रुग्णालयातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट नातलगांना मैसेज करुन रुग्णांना हलवण्याचा सल्ला दिला जात असल्याचे दिसुन आले.
असाच प्रकार नागपूर मध्ये घडला. नागपूरच्या जवाहरलाल नेहरु रुग्णालयात घटना घडली असून येथे तिघांना जीव गमवावा लागला आहे. या रुग्णालयातही नातेवाईकांनी गोंधळ घातला. तर अहमदनगर येथेही जिल्हा रुग्णालयात एका 75 वर्षीय रुग्णाचा अॉक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे.