मन सुन्न करणारी घटना…. मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न….

बीड: दि.२४- सर्वत्र मुलींच्या जन्माचं स्वागत अनोख्या पध्दतीने होत असताना मात्र राष्ट्रीय कन्या दिवसाच्या पूर्वसंध्येला बीडमधून (Beed) मन सुन्न करणारी बातमी आहे. दुसरीही मुलगी झाली म्हणून पोलीस कर्मचाऱ्याच्या विवाहित मुलीला डॉक्टर (Doctor) पतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

वंशाचा दिवा हवा या हव्यासापोटी बीडमध्ये दुसरीही मुलगीच झाल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही विवाहिता पोलीस (Police) कर्मचाऱ्याची मुलगी आहे. तिच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडितेची तक्रार घेण्याऐवजी उस्मानाबादच्या कळंब पोलिसांनी (Police) विवाहितेला हाकलून दिल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला होता. पोलिसाच्याच मुलीबद्दल झालेल्या दुरव्यवहार लक्षात येताच कळंब पोलिसांनी मध्य रात्री बीडचे (Beed) शासकीय रुग्णालय गाठले आणि पीडितेची तक्रार घेत डॉक्टर (Doctor) पती आणि सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. विशाल घुगे असं आरोपी डॉक्टरचं नाव असून गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!