धक्कादायक… विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात 40 जणं विहिरीत पडले; जमीन घसरल्याने घडली दुर्घटना.

विदिशा दि.16 जुलै – विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात 30 ते 40 लोक विहिरीमध्ये पडल्याची घटना रात्री घडली. मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) विदिशा (Vidisha) जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेतून 20 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. घटनास्थळी ऐनडिआरएफ (NDRF), पोलीस (Police) आणि एसडीआरएफची (SDRF) च्या टीमनी मदतकार्य केले.

(Shocking … 40 fell into a well in an attempt to save a child who fell into a well; The accident happened due to landslide.)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात विदिशा (Vidisha) जिल्ह्यातील गंजबासौदामधील लालपठार या गावात ही घटना घडली आहे. दि.15 जुलै गुरुवारी रात्री विहिरीमध्ये एक मुलगा पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी गावातील लोकांनी धाव घेतली. विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. विहिरीच्या कठड्याभोवती लोक गोळा झाली होती. त्याचवेळी विहिरीच्या आजूबाजूची जमीन घसरली आणि अनेक लोकं विहिरीत पडली.

मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गावातील काही तरुण विहिरीत पडले. रात्रीचा अंधार असल्यामुळे नेमकं काय घडलं याची कल्पना कुणालाच आली नाही. लोकांनी एकच आरडाओरडा केल्यामुळे इतर गावातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा घटना समोर आली.

पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच गावात घटनास्थळी धाव घेतली. एनडिआरएफ (NDRF), पोलीस (Police) आणि एसडीआरएफची (SDRF) टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली. तात्काळ बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. क्रेन, जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत 20 जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं होतं.

माध्यमातून बातम्या समोर येताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी घटनेबद्दल माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर मदतकार्य सुरू होते. NDRF ची टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू असल्याचे प्रशासनाकडून रात्री सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!