धक्कादायक … आरोपीच्या मामाची आत्महत्या; तर नातवाच्या खूनाच्या धक्क्याने आजोबांचे निधन.

शिरूर दि.26 मे – शिरुर कासार येथील सराफा हत्या प्रकरणातील आरोपीचा मामा आदिनाथ धोंडीराम गायके या तरुणाने आत्महत्या (Suicide) केली तर मयत सराफाच्या आजोबांना नातवाचा खून (Murder) सहन न झाल्याने निधन झाल्याची घटना घडली. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावत मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे आदिनाथ धोंडीराम गायके (25) या वर्षीय तरुणाने पोलिसांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.
(Shocking … Accused’s uncle commits suicide; Grandfather died in the shock of his grandson’s murder.)
सदरील आत्महत्येची धक्कादायक घटना रात्री शिरूर शहरात घडली. मयताच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या केवळ शिरूर पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचा आरोप केला. मात्र पोलिसांनी हे आरोप धुडकावून लावले आज दि.26 बुधवार रोजी सकाळी आदिनाथ यांच्या पार्थिवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या चार दिवसापूर्वी शिरूर येथील सराफाची हत्या (Murder) करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी भैय्या गायकवाड हा फरार असून यातील अन्य दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. भैय्या गायकवाड याचा तपास करण्यासाठी पोलिस वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत. त्याच्या शोधासाठी भैय्याचा मामा आदिनाथ धोंडीराम गायके (25) यास चौकशीसाठी बोलून आपणास अपमानास्पद वागणूक देत त्याला मारहाणही केली गेली.
यातूनच आजिनाथ गायके याने रात्री शिरूर येथील सलूनच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. सदरचा प्रकार हा रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणात शिरूर पोलिसांनी (Police) घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
आज सकाळी मयत आदिनाथ यांच्या बहिणीने शिरूर पोलीसात येऊन तुमच्या त्रासाला कंटाळूनच माझ्या भावाने आत्महत्या केल्याची तक्रार केली. मात्र अशी तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. त्याच बरोबर अजिनाथ गायके यास चौकशीसाठी बोलावले नसल्याचा दावाही शिरूर पोलिसांनी केला, मात्र गायके यांच्या नातेवाइकांमध्ये पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आदिनाथने आत्महत्या केली अशी चर्चा सुरू आहे.
नातवाचा खून झाल्याचा धक्का सहन न झाल्याने आजोबाचा मृत्यू.
दरम्यान, चार दिवसांपुर्वी सराफा व्यवसायिकाचा सोने खरेदीच्या बहाण्याने खून झाल्याची घटना शिरूरमध्ये घडली ,आपल्या नातवाचा खून झाला या धक्क्याने बुधवारी आजोबाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली.
येथील बालाजी नगर मधे कुल्थे कुटूंब राहत असुन सराफा व्यवसायिक आहेत. चार दिवसांपुर्वी विशाल कुल्थे या तरूणाचा खून झाला. आपल्या नातवाचा खून झाला हा मोठा धक्का आजोबा सुधाकर कुल्थे यांना सहन न झाल्याने त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. चारच दिवसात नातू व आजोबा दोघांच्या मृत्यूने कुल्थे कुटूंबावर मोठी आपत्ती कोसळली आहे.