धक्कादायक… बीडच्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णाचा मृत्यू; बाधित भागातील 345 घरांचे सर्वेक्षण.

बीड दि.10 अॉगस्ट – बीड जिल्ह्यात रविवारी दि.8 अॉगस्टला ‘डेल्टा प्लस’च्या (Delta Plus) पहिल्या रुग्णाची नोंद झाली. मात्र सोमवारी आरोग्य विभाग सर्वेक्षणाला (survey) गेल्यावर या रुग्णाचा महिन्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. याभागातील 345 घरांचे सर्वेक्षण करण्याला सुरुवात करण्यात आली आहे.
(Shocking … Beed’s ‘Delta Plus’ patient dies; Survey of 345 houses in the affected area.)
स्वॅब (Swab) दिल्यापासून तब्बल दोन महिन्यांनंतर सदरील रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या दिरंगाईबाबत चर्चा होत असून खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र बीडमध्ये (Beed) खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार बीड शहरातील अजिजपुरा भागातील 70 वर्षीय रुग्ण 3 जून रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. 4 जून रोजी आरटीपीसीआर (RTPCR) स्वॅब घेतल्यानंतर 5 जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सुरुवातीपासूनच या रुग्णाची ऑक्सिजन (oxygen) लेव्हल 64 होती. तसेच त्याला बायपॅपवर घेण्यात आले होते. चार दिवस बायपॅप लावल्यावर प्रकृती सुधारली.
बाधित रुग्णाला अगोदरच किडनी, डायबिटीज, हायपर टेंन्शन असे विविध आजार होते. किडनीचा आजार असल्याने डॉक्टरांनी त्याला डायलेसिस (Dialysis) करण्याचा सल्ला दिला. मात्र यास नातेवाइकांनी नकार दिल्याची नोंद करण्यात आलेली आहे. दि.29 जून रोजी रुग्णांच्या जावयाने स्वाक्षरी करुन डॉक्टरांच्या सल्ल्याविरोधात रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून बाहेर काढले. त्यानंतर 5 जुलै रोजी त्याचा घरीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
ही धक्कादायक माहिती सोमवारी आरोग्य विभागाला मिळाली. दरम्यान, रुग्णाची माहिती मिळताच आरोग्य विभागाकडून (Health department) सकाळपासूनच सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. या परिसरातील 345 घरांचे तीन पथकांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. लक्षणे असणाऱ्यांचे समुपदेशन करून कोरोना चाचणी (Corona Test) करण्याबाबत आवाहन केले जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी सांगितले.