सेवानिवृत्त शिक्षक शंकर लोकरे यांचे निधन;

किल्लेधारूर दि.14 मे – धारूर (Dharur) येथील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक (Retired teacher) शंकर धोंडीबा लोकरे (80) वर्ष यांचे शुक्रवारी सांयकाळी 6 च्या दरम्यान राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.
(Retired teacher Shankar Lokare passes away;)
लोकरे गुरुजी म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागात त्यांनी 35 वर्ष शिक्षक म्हणून उत्कृष्ट काम केले. ग्रामीण भागात आदर्श शिक्षक म्हणून ते परिचीत होते. तालुक्यात जुन्या पिढीतील कठोर शिस्तीचे व विद्यार्थ्यांत आदरयुक्त भिती असणारे शिक्षक म्हणूनही परिचीत होते.
येथील वीज मंडळातील कर्मचारी बालाजी लोकरे व इलेक्ट्रिक व्यवसायिक गजानन लोकरे यांचे ते वडिल होत. गेल्या दोन वर्षांपासुन ते आजारी होते. आज दि.14 शुक्रवारी सांयकाळी 6 वाजेच्या दरम्यान राहत्या घरी त्यांची प्राणज्योत (passes away) मावळली. त्यांच्या पार्थीवावर धारूर (Dharur) येथील वैकूंठधाम स्मशानभुमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.