धक्कादायक … परदेशी कुटूंबावर कोरोनाचा घाला; एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू. दोन पत्रकार कोरोनाचे बळी

जळगाव दि.26 मार्च- जळगाव जिल्हयाच्या रावेर तालुक्यातील सावधा येथील सामनाचे प्रतिनिधी कैलाशसिंह परदेशी यांचा कोरोनाने आज बळी घेतला आहे. परंतू त्यांच्या कुटुंबातले कोरोनाचे ते पहिलेच शिकार नाहीत. दोन दिवस अगोदर त्यांचे बंधू किशोरसिंह परदेशी आणि त्यांच्या पत्नी संगीता परदेशी याचंही कोरोनामुळे निधन झाले. घरातील दोन मुलं आणि सून यांचा आकस्मित मृत्यू झाल्याने त्यांच्या 85 वर्षांच्या मातोश्रींवर पहाडच कोसळला. हा धक्का त्या पचवू शकल्या नाहीत. तिघांच्या मृत्यूच्या धक्क्यानं त्याचंही निधन झालं. चार दिवसात एकाच कुटुंबातले चार मृत्यू झाल्यानं सार्या जळगाव जिल्हयाला धक्का बसला आहे.
(Shocking … Corona strikes a foreign family; Four members of the same family died. Two journalists killed by Corona)
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या माहितीन्वये तिघांना कोविडची लागण (Corona Positive) झाल्यानंतर त्यांनी तीन दिवस घरगुती उपाय केले. म्हणजे त्यांनी रूग्णालयात जायला विलंब केला. त्यामुळे आजार वाढत गेला आणि त्यात त्यांचे निधन (Death) झाले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी परदेशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून 1990 पासून परदेशी सामनाचे पत्रकार होते. अत्यंत प्रामाणिक आणि कठोर परिश्रम करणारे पत्रकार (journalist) म्हणून ते सर्वपरिचित होते अशा भावना त्यानी व्यक्त केल्या आहेत.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून राज्यातील सर्वच पत्रकारांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. परदेशी कुटुंबाला सरकारनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही एस.एम.देशमुख यांनी केली आहे. एकाच कुटुंबातील चार व्यक्ती चार दिवसात मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.
पत्रकार सूर्यभान पाटील यांचे आज कोरोनामुळे निधन
जळगाव येथूनच आणखी एक दुःखद बातमी आली आहे. जळगाव येथील “इटीव्ही भारत” चे प्रतिनिधी सूर्यभान पाटील यांचं आज दुपारी कोरोनानं निधन (Death) झालं. कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याने गेली चार दिवस त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. झी – 24 तास, तेव्हाचा स्टार माझाला कॅमेरामन म्हणून काम करणारे सूर्यभान पाटील नंतर इटीव्ही चे प्रतिनिधीं झाले. एक धडपडे पत्रकार (journalist) म्हणून परिचित होते. दरम्यान, जळगाव मधील दोन पत्रकारांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी अशी मागणी जळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने केली आहे. ऑगस्ट 2020 नंतर राज्यातील 66 पत्रकारांचे कोरोनानं बळी घेतले आहेत.