धक्कादायक … नेकनुर येथे पती पत्नीची आत्महत्या; गावात शोककळा.

बीड दि.16 डिसेंबर – बीड (Beed) तालुक्यातील नेकनुर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे धक्कादायक घटना घडली. नवदाम्पत्य असलेल्या पती पत्नी ने आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी नेकनुर पोलीसांनी तातडीने जावुन मृतदेह ताब्यात घेत नेकनुरच्या स्त्री व कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
(Shocking … Husband and wife commit suicide at Neknur; Mourning in the village.)
बीड तालुक्यातील व नेकनुर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे आज धक्कादायक घटना घडली असुन नव विवाहित पती पत्नीने आत्महत्या (suicide) केली आहे. वैतागवाडी येथील राजेश जगदाळे (वय 27) आणि दिपाली डिसले (वय 24) दोघेही वैतागवाडी येथील रहिवासी आहेत. यांचा विवाह 11 महिन्यापूर्वी वैतागवाडी येथे झाला होता. मयत महिला ही गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. आज दि.16 डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास वैतागवाडी येथे राहत्या घरात पती पत्नीने आत्महत्या (commit suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.
राजेश व दिपाली दोघांचे आई वडील शेतात तुर काढण्यासाठी गेले होते. गावात एका ठिकाणी सोळाव्याचा कार्यक्रम होता म्हणून ते घरी आले असता घराचे दार आतून बंद होते. त्यानी आवाज दिला खटके दिले तरी आतून काहीच प्रतिक्रिया येत नसल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता दिपाली जगदाळे याचा मृतदेह बेडवर पडलेला होता तर राजेश जगदाळे हा लोखंडी आळुला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता.
या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच घटनेचा उलगडा होईल. या घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (PSI) विलास जाधव पोलीस कर्मचारी परमेश्वर सानप, प्रशांत क्षीरसागर हे घटनास्थळी हजर झाले.
घटनेची वार्ता पसरताच गावातील लोक घटनास्थळी जमा झाले होते. या घटनेने संपूर्ण गावाला धक्का बसला असून असुन सर्वांच्या डोळ्यात आश्रु वाहत होते. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश ऱ्हदय पिळवटून टाकणारा होता.