क्राईम

moneylender.. धारुर पोलिसांत सावकारा विरोधात गुन्हा दाखल.

52 / 100

किल्लेधारूर दि.27 नोव्हेंबर – moneylender.. धारूर तालुक्यातील जहागीरमोहा येथे श्रीमंत साहेबराव कोकाटे यांनी रंभाबाई शिरसाट यांच्या पतीचे घर सावकारकी मध्ये घेतले होते . परंतु पैसे परत देऊनही घर परत न दिल्यामुळे रंभाबाई शिरसाट यांनी सहाय्यक निबंधक Assistant Registrar यांना दिलेल्या तक्रारीची चौकशी करून श्रीमंत कोकाटे यांच्या विरोधात धारुर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

तालुक्यातील जहागिरमोहा येथील श्रीमंत साहेबराव कोकाटे, हा. मु. अशोक नगर, धारुर याने अर्जदार रंभाबाई भागवत सिरसट यांच्या पतीच्या नावे मौजे जहागीरमोहा येथील रहाते घर अवैध सावकारीमध्ये रक्कम रु ८० हजार इतक्या रक्कमध्ये खरेदीखत करुन घेवून सदर घर रक्कम परत दिली होती . रक्कम परत करूनही घर परत करत नसल्याने गैरअर्जदार यांच्यावर कार्यवाही करण्याबाबतची तक्रार सहाय्यक निबंधक Assistant Registrar, सहकारी संस्था, धारुर या कार्यालयास दि १३ जुलै रोजी देण्यात आली होती. त्यानुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, धारुर या कार्यालयाने सदरील तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांचे कार्यालयास दि. १४ जुलै रोजीच्या पत्रान्वये सादर केलेली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक यांनी सदर सावकारी moneylender.. तक्रारी अर्जावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ मधील तरतुदी अन्वये कायदेशीर कार्यवाही व सखोल पडताळणी (चौकशी ) करुन अहवाल त्यांचे कार्यालयास सादर करण्या बाबत सुचित केलेले होते. त्यानुसार सदर प्रकरणी सहाय्यक निबंधक धारुर या कार्यालयाने महाराष्ट्र सावकारी तरतुदीन्वये निर्देश निर्गमित करुन सदर प्रकरणी, श्रीमंत कोकाटे, यांचे रहाते धारूर Dharur येथील घरी घरझडती ६ सप्टेंबर रोजी पथकातील सर्व सदस्य, पंच व पोलिस Police कर्मचारी यांचेसमवेत घरझडती घेण्यात आली . घरातून घरझडती दरम्यान आढळून आलेले आक्षेपार्ह कागदपत्रे, नोंदवह्या (डायरी) इत्यादी ताब्यात घेऊन सदर दस्तऐवजांची पडताळणी करुन व गैरअर्जदार यांना त्यांचे म्हणने मांडण्याची पुरेशी संधी देवून सदर प्रकरणी घरझडती दरम्यान अवैद्ध सावकारीशी संबंधीत व्याज व मुद्दल रक्कमांचा उल्लेख असलेल्या आक्षपार्ह नोंदी आढळुन आल्या होत्या . त्यानुसार सदर प्रकरणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांनी १६ नोहेंबर पत्र देवून श्रीमंत साहेबराव कोकाटे यांचे विरुध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम तरतुदीन्वये फिर्याद दाखल करण्यासाठी सहाय्यक निबंधक धारूर Dharur येथील शिवराज नेहरकर यांना प्राधिकार पत्र दिलेले होते. त्यानुसार शिवाजी नेहरकर यांनी 26 सप्टेंबर रोजी धारूर पोलीस Police ठाण्यात रीतसर तक्रार देऊन कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!