कोरोंना विशेष

धक्कादायक… कपड्याच्या मास्कने वाढला धोका; AIIMS च्या संशोधनाचा निष्कर्ष.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दि.1 अॉगस्ट- दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेत (AIIMS) 352 रूग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनाचे निष्कर्ष समोर आले आहेत. यामध्ये म्हटले आहे की, कमी रोगप्रतिकारशक्ती (Immunity) असलेल्या रूग्णांनी कपड्याचा मास्क घालू नये. डॉक्टरांनुसार मोठ्या कालावधीपर्यंत कपड्याचा मास्क घातल्याने घाण झाल्याने ब्लॅक फंगस (Black fungus) होण्याची शक्यता वाढते. विशेष करून असे रूग्ण ज्यांची रोगप्रतिकारशक्ती खुप कमी आहे. त्यांनी खुप जास्त काळजी घेतली पाहिजे.

(Shocking … increased risk with clothing masks; Findings from AIIMS research.)

गेल्या दिड वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गात (Corona Infection) अनेक नवनवीन संशोधन होत आहेत. आजवर कोरोनावर प्रभावशाली औषधं उपलब्ध झालेली नाहीत. मात्र सोशल डिस्टंट, मास्क (Mask) वापरणे, हात धुणे, सॕनिटायझर वापरणे याचा प्रभाव दिसून आलेला आहे. मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना कपड्याच्या मास्कचा सतत होणारा वापर धोकादायक ठरत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे.

संशोधनातील महत्वाचे निष्कर्ष
– संशोधनात ब्लॅक फंगसने पीडित मिळालेल्या केवळ 18 टक्के रूग्णांनीच एन95 मास्कचा वापर केला होता.
– तर संशोधनात ब्लॅक फंगस संसर्ग नसलेल्या जवळपास 43 टक्के अशा रूग्णांनी एन95 मास्कचा वापर केला.
– 52 टक्के लोक करत आहेत मास्कचा वापर
– 71.2 टक्के लोकांनी सर्जिकल किंवा कपड्याचा मास्क वापरला होता.
– कपड्याच्या घाणेरड्या मास्कचा अनेकदा आणि खुप जास्त वापर केला जातो.
– कपड्याच्या मास्क खाली सर्जिकल मास्क घाला.

असा वापरा मास्क
1- मास्कने नाक आणि तोंड पूर्णपणे झाकून घ्या.
2- मास्क वापरताना त्यास बाहेरून स्पर्श करू नका.
3 -सर्जिकल मास्क एकवेळ पेक्षा जास्त वापरू नका.
4 -कपड्याचा मास्क चांगला धुतल्यानंतर घाला.
5 -मास्क कधीही उलटा वापरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!