धक्कादायक… केवळ 31 हजारांसाठी तरुणाचा खून; उसनवारी आली जीवावर.

कोरेगाव दि.7 अॉगस्ट – उसने घेतलेले 31 हजार रुपये परत न दिल्याने खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार कुमठे (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत घडला. विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही युवक केवळ अठरा वर्षांचे तर मयत तरुण 35 वर्षाचा ग्रामपंचायत सदस्य आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) देवानंद संजय गोरे (वय 18) व कमलेश मधुकर यादव (वय 18, दोघेही रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितांना न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी (Police custody) सुनावली आहे.

(Shocking … murder of a young man for only 31 thousand; Usanwari came to life.)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गोळेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश जाधव हे बुधवार दि.4 ऑगस्टपासून बेपत्ता होते. यानंतर गुरूवारी दि. 5 रोजी कुमठे गावच्या हद्दीत धोम धरणाच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर मंगेश जाधव यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक (Police Inspector) विशाल कदम व कर्मचाऱ्यांचे पथक तपासासाठी तयार करण्यात आले. या तपास पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या देवानंद व कमलेश यांची नावे निष्पन्न झाली.

पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेवून चौकशी केली. मंगेश जाधव याला देवानंद व मधुकर यांनी 31 हजार रूपये उसने दिले होते. मात्र, वारंवार पैसे मागूनही मंगेश पैसे परत देत नसल्याने मंगेशचा काटा काढण्याचे दोघांनी ठरवले. त्यानुसार दि. 4 रोजी दोघांनी मंगेश याला धोम कॅनॉलच्या (Canol) बाजूला नेले. याठिकाणी त्याला लोखंडी पाईपने मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले, अशी कबुली दोन्ही संशयितांनी दिली.

कोरेगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासांत तपास करून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक अर्चना शिंदे, सपोनि (API) संजय बोंबले, गणेश कड, पोलिस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद सावंत, हवालदार कमलाकर कुंभार, प्रमोद चव्हाण, मिलिंद कुंभार, धनंजय दळवी, अमोल सपकाळ, सनी आवटे, साहिल झारी, सागर गायकवाड, सागर जाधव यांनी सहभाग घेतला. संशयितांना न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!