कोरोंना विशेष

धारुरमधील आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर)- येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज केवळ ७ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यातील २ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) आढळली आहेत. तर येथून काल पाठवण्यात आलेली ४ स्वॅब अहवाला पैकी २ निगेटिव्ह तर २ अनिर्णित आली आहेत. आज शहरातील पॉझिटीव्ह (Positive) संख्या केवळ २ आहे.

गेली आठवडाभर ॲन्टीजन तपासण्या व स्वॅब (Swab) नमुने अत्यंत कमी प्रमाणात होत आहेत. यामुळे पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची संख्याही कमी आहे. आज केवळ ७ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात २ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) आढळली आहेत. तर कालची ४ स्वॅब (Swab) नमुने पैकी २ निगेटिव्ह तर २ अनिर्णित आली आहेत. आज केवळ २ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) असून आज ११ जनांचे स्वॅब नमुने अंबाजोगाईला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (Antigen)

१. ३३ वर्षीय पुरुष, कसबा, धारुर

२. ३० वर्षीय पुरुष, क्रांती चौक, धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!